Join us  

ई-कॉमर्स व्यवसायात पोस्टाची दमदार एंट्री, amazon, flipkartला मिळणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:03 PM

ई- कॉमर्स वेबसाइटची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात आता भारतीय पोस्ट ऑफिसनंही पाऊल ठेवलं आहे.

नवी दिल्ली- ई- कॉमर्स वेबसाइटची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात आता भारतीय पोस्ट ऑफिसनंही पाऊल ठेवलं आहे. भारतीय पोस्टानं ई-कॉमर्स पोर्टल लाँच केलं आहे. या पोस्टाच्या पोर्टलवरून ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत चांगल्या वस्तू विकत घेता येणार आहे. पोस्टानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे फ्लिपकार्ट आणि amazon सारख्या कंपन्यांना कडवी टक्कर मिळणार आहे.इंडियन पोस्टाच्या या पोर्टल एक खासियत आहे. देशातल्या गावागावात पोस्टमन काका जात असल्यानं आपण एखाद्या खेड्यातून मागवलेली वस्तूही घरपोच दिली जाणार आहे. त्यामुळे पोस्टाच्या पोर्टलचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते या पोर्टलचं लाँचिंग करण्यात आलं आहे. या ई-कॉमर्स पोर्टलवर पोस्टातील सर्व उत्पादनं मिळणार आहेत. या पोर्टलनं पोस्ट ऑफिस डिजिटल बाजाराशी जोडला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखं सारखं पोस्टात जावं लागणार नाही. या पोस्टाच्या पोर्टलवरून मिळणाऱ्या उत्पादनात कपडे, फॅशन व ज्वेलरी, आदिवासांनी तयार केलेली उत्पादनं, बॅग, गिफ्ट आयटम, बास्केट, जैविक उत्पादनं, हँडलूम उत्पादनं, दैनंदिन जीवनात उपयोगाला येणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

ऑनलाइन उघडता येणार पोस्टल बँक खातेभारतीय पोस्ट ऑफिसनं आता आपल्याला बँकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. या सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यासाठी त्यांना ऑनलाइन केल्या आहेत. आता आपण आरडी, पीएफ योजनेशी संबंधित कामं घरी बसून करू शकता. आता ग्राहक घरबसल्या करू शकतो हे काम- ग्राहक आता इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सर्व कामे करू शकतात- यात 17 कोटी पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांना ऑनलाइन पैसे वळते करण्याची सुविधा मिळणार आहे. - तसेच ग्राहक ऑनलाइन देवाण-घेवाणीचे व्यवहारही करू शकणार आहेत. - इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण RD, TD, पीपीएफ खाती उघडू शकतो.  

टॅग्स :पोस्ट ऑफिस