नवी दिल्ली : देशाच्या निर्यात नकाशावर मोठी झेप घेत स्मार्टफोन हा २०२५ मध्ये भारताचा क्रमांक एक निर्यात घटक ठरला आहे. २०२५ या वर्षात भारताने तब्बल ३० अब्ज डॉलर्स (सुमारे २.५ लाख कोटी रुपये) किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली. मात्र २०२६ मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत १२% ते १५% पर्यंत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
२०२४-२५ मध्ये देशात ५.५ लाख
कोटी रुपये (सुमारे ६० अब्ज डॉलर) किमतीचे मोबाईल उत्पादन झाले, तर त्यापैकी २ लाख कोटी रुपये (सुमारे २२ अब्ज डॉलर) किमतीची निर्यात झाली होती. २०२५ मध्ये ही निर्यात वाढून ३० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. देश 'जगाची स्मार्टफोन फॅक्टरी' बनत असल्याचेही अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
उद्योगावर दबाव का?
भारतातील स्मार्टफोन बाजारपेठ यंदा मोठ्या अस्थिरतेला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.
जागतिक पुरवठा तुटवडा, रुपयातील चढ-उतार व मेमरी-स्टोरेज घटकांच्या वाढलेल्या किमतींमुळे उद्योगावर दबाव वाढला आहे.
अॅपलचा 'मोठा' वाटा
अमेरिकेने चीनवरील शुल्क १ कडक केल्यानंतर अॅपलने भारतातील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवले. आहे. २०२५ मध्ये भारतात सुमारे ३० कोटी युनिट्स मोबाइल उत्पादन झाले.
भारतात उत्पादित होणाऱ्या दर ४ 3 पैकी १ स्मार्टफोन आता निर्यात केला जात आहे. अमेरिका, युरोपसारख्या बाजारपेठांमध्ये भारतात बनवलेल्या अॅपल, सॅमसंग आणि मोटोरोलाच्या महागड्या फोन्सना मोठी मागणी आहे.
सेमिकंडक्टरमुळे 'बूस्टर'
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एकूण निर्यात २०२५ मध्ये ४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. यंदा देशात चार नवीन सेमिकंडक्टर प्लंट उत्पादन सुरू करणार आहेत. यामुळे भारताची निर्यात क्षमता आणखी वाढेल आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.
Web Summary : India's smartphone exports boom, reaching $30 billion by 2025. Domestic production surges, driven by Apple and semiconductor investments. However, a market dip is expected in 2026.
Web Summary : भारत का स्मार्टफोन निर्यात 2025 तक 30 अरब डॉलर तक पहुंचा। ऐप्पल और सेमीकंडक्टर निवेश से घरेलू उत्पादन बढ़ा। हालांकि, 2026 में बाजार में गिरावट की आशंका है।