Join us  

दोन दशकांमध्ये भारत पहिल्या तीनात : मुकेश अंबानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 4:05 AM

देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न दुप्पट झालेले असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांच्याशी चर्चा करताना मुकेश अंबानी यांनी हे मत व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : येत्या दोन दशकांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन क्रमांकामध्ये असेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. या काळामध्ये देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न दुप्पट झालेले असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांच्याशी चर्चा करताना मुकेश अंबानी यांनी हे मत व्यक्त केले आहे. भारतामधील मध्यमवर्ग हा सध्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे, त्यामध्ये प्रतिवर्षी तीन ते चार टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित असल्याचेही अंबानी यांनी या चर्चेमध्ये स्पष्ट केले. सध्या प्रत्येक भारतीयांचे उत्पन्न सरासरी १८०० ते २००० डॉलर असून, त्यामध्ये वाढ होऊन ते ५००० डॉलर होण्याची अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. आगामी काळामध्ये भारतीय समाज हा प्रमुख डिजिटल समाज बनेल आणि देशातील युवावर्गच त्याचा आधार असेल, असे मतही अंबानी यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्समार्क झुकेरबर्ग