Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत बनला निर्यातदार मंदीनंतर यंदा स्टील उत्पादनात वाढ - प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 02:29 IST

गेल्या तीन वर्षांत भारतातील पोलाद उत्पादन अंशत: वाढले आहे.

नवी दिल्ली : मंदी सोसल्यानंतर भारतातील पोलाद उत्पादन क्षेत्रात वृद्धी दिसून येत आहे. चालू वित्त वर्षात भारत पोलादाचा शुद्ध निर्यातदार देश बनला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.हरयाणात पोलाद प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे का, या प्रश्नावर प्रधान यांनी सांगितले की, पोलाद हे अनियंत्रित क्षेत्र आहे.नवीन पोलाद प्रकल्प उभारायचे का, उभारायचे असतील तर कोठे उभारायचे, यासंबंधीचे नियंत्रण बाजार शक्ती आणि व्यावसायिक गरजेनुसार होतात.गेल्या तीन वर्षांत भारतातील पोलाद उत्पादन अंशत: वाढले आहे. २०१६-१७ मध्ये भारतातील पोलाद उत्पादन ७.२३ दशलक्ष टन होते. २०१८-१९ मध्ये ते वाढून ७.८३ दशलक्ष टन झाले आहे. चालू वित्त वर्षात भारत पोलादाचा शुद्ध निर्यातदार देश बनला आहे. - धर्मेंद्र प्रधान

टॅग्स :व्यवसाय