Join us

भारत आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 01:27 IST

आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान भारत २०१८ मध्येही कायम राखील, असे आशियाई विकास बँकेने (एडीबी) म्हटले आहे.

नवी दिल्ली : आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान भारत २०१८ मध्येही कायम राखील, असे आशियाई विकास बँकेने (एडीबी) म्हटले आहे. भारताच्या बळावर दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने वाढणारा उपविभाग ठरेल, असेही ‘एडीबी’ने म्हटले आहे.एडीबीने ‘आशियाई विकास दृष्टीकोन’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिका आणि तिच्या व्यापारी भागीदारांत तणाव निर्माण झाला असला तरी आशिया आणि प्रशांत विभागातील विकसनशील अर्थव्यवस्थांची वृद्धी २०१८ आणि २०१९ मध्ये मजबूत राहील. दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने वाढणारा उपविभाग ठरेल. यात भारत नेतृत्वस्थानी राहील.

टॅग्स :अर्थव्यवस्था