Join us

निर्देशांकांचे नवनवीन विक्रम सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 23:02 IST

बाजारात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, नफा कमविण्यासाठी मोठी विक्री झाल्यास येत्या सप्ताहामध्ये बाजारात थोड्या प्रमाणात करेक्शन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

- प्रसाद गो. जोशीकेंद्रीय अर्थसंकल्पाचे तेजीने जोरदार स्वागत करणाऱ्या शेअर बाजाराने सप्ताहामध्ये अनेक नवनवीन विक्रम नोंदवले आहेत. सेन्सेक्सने ५१ हजारांचा टप्पा पार केला तर निफ्टी पुन्हा १५ हजारांच्या जवळ आला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांनी १९ हजारांची पातळी ओलांडली आहे. बाजारात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, नफा कमविण्यासाठी मोठी विक्री झाल्यास येत्या सप्ताहामध्ये बाजारात थोड्या प्रमाणात करेक्शन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्थसंकल्पानंतर बाजाराने घेतलेल्या उसळीने ५० आणि ५१ हजारांचा टप्पा लिलया ओलांडला. सप्ताहाच्या उत्तरार्धात बाजार काहीसा कमी झाल्याने तो ५१ हजारांची पातळी टिकवू शकला नाही. आगामी सप्ताहात करेक्शन शक्य आहेत.परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदीअर्थसंकल्प सादर झाल्यापासून बाजारामध्ये बैलाचा सुरू असलेला संचार कायम आहे. गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पुढे येत असून, परकीय वित्त संस्थांकडून जोरदार खरेदी केली जात आहे. गतसप्ताहात परकीय वित्त संस्थांनी १३,५९५.१६ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. या आधीच्या सप्ताहात मात्र त्यांनी विक्री केली होती. स्थानिक वित्त संस्थांनी आपला विक्रीचा पवित्रा कायम राखला आहे. गत सप्ताहातही ४,७१२.६० कोटी रुपयांची विक्री केली आहे. तिमाही निकालावर लक्षआगामी सप्ताहामध्ये बाजाराला चालना देणाऱ्या फारशा बाबी नाहीत. त्यामुळे विविध आस्थापनांचे जाहीर होणारे तिमाही निकाल आणि जागतिक बाजारातील घडामोडी यांच्यावरच बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे. सप्ताहातील स्थितीनिर्देशांक    बंद मूल्य    बदलसेन्सेक्स    ५०,७३१.६३ +४४४५.८६ निफ्टी       १४,९२४.२५ +१२८९.६५मिडकॅप    १९,४१३.१७ +१३३०.९४स्मॉलकॅप       १९,०९६.०६  +११०७.८६ 

टॅग्स :शेअर बाजार