Join us  

अनिश्चित वातावरणामध्येही वाढ; २०० अब्ज डॉलरची रिलायन्स पहिली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 2:09 AM

मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे बरी आणि थोडी घट झाल्याचे दिसून आले.

-  प्रसाद गो. जोशी

जगभरातील शेअर बाजारामध्ये असलेल्या अनिश्चित वातावरणाचा परिणाम भारतामधील शेअर बाजारावरही झालेला दिसून आला. असे असले तरी सप्ताहाच्या अखेरीस बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी वाढ नोंदविली. मात्र, क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घट झालेली दिसून येत आहे.मुंबई शेअर बाजाराचा प्रारंभ गतसप्ताहात घसरणीने झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३८,९७८.५२ ते ३७,९३५.१६ अंशांदरम्यान हेलकावत होता. मात्र सप्ताहाची अखेर त्याने वाढीने केली. राष्टÑीय शेअर बाजारामध्येही अशीच स्थिती दिसून आली. बाजारातील प्रमुख कंपनी असलेल्या रिलायन्सच्या दरामध्ये झालेल्या चांगल्या वाढीमुळे बाजार वरील पातळीवर बंद होऊ शकला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे बरी आणि थोडी घट झाल्याचे दिसून आले. अनेक स्मॉलकॅप कंपन्यांचे तिमाही निकाल सध्या जाहीर होत आहेत. त्यामुळे त्यानुसार या कंपन्यांचे दर वर-खाली होत असून, त्याचा परिणाम या निर्देशांकामध्ये दिसतो आहे. मिडकॅप कंपन्यांमधील वाढ अथवा घट ही त्या प्रमाणात कमी होते आहे.भारत आणि चीनदरम्यान सीमेवर वाढत असलेला तणाव तसेच अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावरून सुरू असलेली धुसफूस, जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि लस सापडण्यास होत असलेला विलंब या शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या प्रमुख बाबी ठरल्या आहेत. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारात घट होत असली तरी युरोपमात्र त्यामानाने शांत आहे.आगामी सप्ताहातील अमेरिकन फेडरल रिझर्व्हची व्याजदराबाबत होणारी बैठक तसेच भारतामधील चलनवाढीची जाहीर होणारी आकडेवारी शेअर बाजारामध्ये काही बदल घडवून आणू शकते. शुक्रवारी जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन आकडेवारीवरही बाजार प्रतिक्रिया देऊ शकेल.२०० अब्ज डॉलरची रिलायन्स पहिली कंपनीरिलायन्स इंडस्ट्रीज ही २०० अब्ज डॉलरचे बाजार भांडवलमूल्य असलेली पहिली भारतीय कंपनी बनली आहे. १० सप्टेंबर रोजी रिलायन्सच्या समभागांचे बाजार भांडवलमूल्य २०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडून गेले. जागतिक मानांकन यादीमध्ये रिलायन्स ४४ व्या स्थानावर पोहोचली आहे. काही दिवस या कंपनीत मोठी गुंतवणूक होत आहे.दृष्टिक्षेपात सप्ताह

टॅग्स :शेअर बाजार