Join us
Daily Top 2Weekly Top 5

Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:26 IST

Truecaller News: आयकर विभागाने Truecaller कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकली. 

Truecaller Income Tax Raid: Truecaller App कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकल्याने खळबळ उडाली. आयकर विभागाच्या पथकाने कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. Truecaller कंपनीवर ट्रान्सफर प्रायसिंग नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याचाच तपास सध्या आयकर विभाग करत आहे. 

स्वीडन स्थित असलेली Truecaller कंपनी भारतासह अनेक देशात लोकप्रिय आहे. Truecaller App तुम्हाला त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव दाखवते, ज्याचा मोबाईल नंबर तुमच्याकडे सेव्ह केलेला नसतो. 

आयकर नियम १०६२ मधील ९२ अ-फ आणि १० अ-ई हे ट्रान्सफर प्रायसिंग संदर्भात आहे. ट्रू कॉल कपंनीवर ट्रान्सफर प्रायसिंगचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या पथकाने Truecaller कंपनीच्या दिल्लीतील कार्यालयावर धाड टाकली. पथकाने कार्यालय आणि परिसराची झाडाझडती घेतली. 

टॅग्स :इन्कम टॅक्सव्यवसाय