Join us

सर्वाधिक विश्वास कोणत्या देशात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 06:16 IST

Which Country Is The Most Trusted: जगभरात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भ वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणता देशातील वातावरण परस्परांसाठी अधिक विश्वासार्ह आहे, हे दर्शवणारा एडेलमॅन ट्रस्ट बॅरोमीटर २०२४ हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : जगभरात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भ वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणता देशातील वातावरण परस्परांसाठी अधिक विश्वासार्ह आहे, हे दर्शवणारा एडेलमॅन ट्रस्ट बॅरोमीटर २०२४ हा अहवाल जारी करण्यात आला आहे. देशांमधील राजकीय ध्रुवीकरण, सरकारचा व्यवहार, कंपन्यांचे काम, स्वयंसेवी संस्थांचे कार्य, नाविन्यपूर्ण प्रयोग तसेच प्रसारमाध्यमांमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आदींचा  यासाठी अभ्यास केला जातो. 

किती जणांचा सहभाग?- देशामधील विश्वासाची स्थिती जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या पाहणीत विविध २८ देशांमधील ३२ हजार जणांची मते जाणून घेण्यात आली आहेत.  - जगभरातील सरासरी विश्वास निर्देशांक २०२३ पेक्षा एका अंशाने वाढल्याचे दिसून आले आहे. - विकसनशिल देशांचा विश्वास निर्देशांक ६३ इतका आहे. विकसित देशांपेक्षा (४९) तो अधिक आहे. - दक्षिण कोरियाचा विश्वास निर्देशांक २०२३ च्या तुलनेत ७ अंकांनी वाढल्याचे या  अहवालातून समोर आले आहे. 

 

टॅग्स :आंतरराष्ट्रीय