Join us

जगात कर्मचारी कपात, भारतात भरती जोरात; सणासुदीतील तेजीचा दिसला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 09:40 IST

इतर क्षेत्रांत नोकरभरती वाढलेली असताना आयटीने चिता वाढविली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी नोकरकपात केली आहे.

नवी दिल्ली: जगभरात कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहेत. मात्र, भारतीय कपन्यांनी नोकरभरती वाढविली आहे. यावर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये २७ टक्के जास्त नोकऱ्या भारतीय कंपन्यांनी दिल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ४३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. नोकरभरती संस्था नोकरी जॉबस्पीकच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार, भारतात जगाच्या विपरीत कल दिसून येत आहे.

'आयटी'ने दिला तापइतर क्षेत्रांत नोकरभरती वाढलेली असताना आयटीने चिता वाढविली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार आयटीमध्ये उणे ८% म्हणजेच घट झाली.

पेप्सिको करणार कपातजयपूर, दिल्ली, मुंबई, ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनमध्ये १० नव्हे तर २० हजार कर्मचायांना घरी बसविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ शीतपेय उत्पादक कंपनी पेप्सिकोदेखील कर्मचारी कपातीच्या तयारीत असल्याचे सुत्रांनी सांगितले,

मुंबई, दिल्ली यासारख्या महानगरांच्या तुलनेत जयपूर, इंदूर, अहमदाबाद, बडोदा यासारख्या शहरांमध्ये सर्वाधिक नोकरभरती झाली आहे. अहमदाबाद राहिले आहे.

महागाई कमी होत आहे. त्यामुळे कंपन्याचा खर्च कमी होत आहे. याशिवाय ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. परिणामी, मागणी वाढत आहे. त्यामुळे मनुष्यबळाची गरज वाढली आहे. -अनंत बालासुब्रमण्यम, उपाध्यक्ष, टीमलीज

डिसेंबरमध्येही नोकरभरतीचा चढ़ा आलेख दिसू शकतो.असा आहे नोकरभरतीचा कलवीमा - ४२%बँकिंग- ३४%रिअल इस्टेट - ३१%ऑईल - २४%ट्रॅव्हल आदरातिथ्य- २०%ऑटोमोबाईल - १४%