Join us  

चीन वाढविणार भारतीय औषधांची आयात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 4:29 AM

व्यापार आघाडीवर चीनने मैत्रीचा हात पुढे करण्याचे संकेत देत शुल्क कमी करून भारतीय औषधांची आयात वाढविण्याचे ठरविले आहे.

बीजिंग - व्यापार आघाडीवर चीनने मैत्रीचा हात पुढे करण्याचे संकेत देत शुल्क कमी करून भारतीय औषधांची आयात वाढविण्याचे ठरविले आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतातील स्वस्तातील जेनेरिक औषधांसाठी चीनची बाजारपेठ खुली होऊ शकते.भारत आणि चीनने भारतीय औषधे, विशेषत: कॅन्सरच्या औषधांवरील शुल्क कमी करण्याचे मान्य केले आहे. पाश्चिमात्य दुय्यम औषधांच्या तुलनेत भारतीय औषधे अधिक स्वस्त असल्याने चीनमध्ये भारतीय औषधांंना मोठी मागणी आहे, असे चीनच्या विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले. भारतातून आयात वाढविण्याचा आणि कॅन्सरच्या उपचारासाठीच्या औषधांवरील आयात शुल्क कमी करण्याचा आमचा इरादा आहे. यामुळे भारतासह दक्षिण आशियातील अन्य देशांनाही व्यापार विस्ताराच्या दृष्टीने मोठी संधी उपलब्ध होईल, असे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुअ चुयीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.माझ्या माहितीप्रमाणे भारत आणि चीनदरम्यानचा औषधी व्यापार सातत्याने वाढत आहे. भारतीय औषधांना चीनी बाजारपेठ खुली करण्यास चालना देण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चांगल्या प्रकारे सामंजस्य आहे. संबंधित विभागाने भारत-चीन व्यापार सहकार्य आणि चिनी बाजारपेठ भारतीय औषधे आयात करण्यास चालना देण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने विशेष उपाययोजना आखली आहे, असे त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)चित्रपटाचाच हा प्रभावभारतीय औषध निर्यात संवर्धन परिषदेच्या माहितीनुसार चीनला २०१४-१५ मध्ये १३८ दशलक्ष डॉलरची औषधे आणि शुद्ध रसायनांची २०१४-१५ मध्ये निर्यात केली होती. कॅन्सरग्रस्त व्यक्तीच्या सत्य जीवन कथेवर आधारित ‘डाइंग टू सर्व्हाईव्ह’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर चीनने औषधांवरील शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. या चित्रपटात एका जण भारतातून तस्करी करून चीनमध्ये औषधे आणत असल्याचे दाखविले आहे.

टॅग्स :औषधंभारतचीन