Join us

PNB चे ग्राहक असाल तर १० एप्रिल पर्यंत पूर्ण करा 'हे' महत्त्वाचं काम, अन्यथा अकाऊंट होईल फ्रीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:52 IST

PNB Bank Rules: जर तुमचं खातं पंजाब नॅशनल बँकेत (PNB) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेनं आपल्या ग्राहकांना १० एप्रिलपर्यंत महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे.

PNB Bank Rules: जर तुमचं खातं पंजाब नॅशनल बँकेत (PNB) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेनं आपल्या ग्राहकांना १० एप्रिल २०२५ पर्यंत नो योर कस्टमर (Know Your Customer) अपडेट करण्याचं आवाहन केलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून ३१ मार्च २०२५ पर्यंत केवायसी अपडेट न झालेल्या खातेदारांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक आहे. 

केवायसी कसं अपडेट करावं?

आपल्याला आपलं केवायसी अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास, आपण खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.

  • बँकेच्या शाखेला भेट द्या – तुमचं ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, अलीकडचा फोटो, पॅनकार्ड/फॉर्म ६०, उत्पन्नाचा पुरावा आणि मोबाइल क्रमांक (आधी दिला नसेल तर) घ्या आणि आपल्या जवळच्या पीएनबी शाखेला भेट द्या आणि केवायसी अपडेट करा.
  • पीएनबी वन अॅपद्वारे - आपण घरबसल्या ऑनलाइन केवायसी अपडेट करू शकता.
  • इंटरनेट बँकिंग (आयबीएस) - पीएनबीच्या ऑनलाइन बँकिंगमध्ये लॉगिन करा आणि केवायसी अपडेटचा पर्याय निवडा.
  • आपण केवायसी कागदपत्रे आपल्या होम ब्रान्चमध्ये नोंदणीकृत ईमेल किंवा पोस्टाद्वारे पाठवू शकता. 

केवायसी अपडेट न केल्यास काय होईल?

जर ग्राहकांनी १० एप्रिल २०२५ पर्यंत केवायसी अपडेट केलं नाही तर ते त्यांच्या खात्यातून कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. बँक खातं तात्पुरतं गोठवलं जाईल, जेणेकरून आपण पैसे जमा करू किंवा काढू शकणार नाही. केवायसी म्हणजेच नो योर कस्टमर ही एक बँकिंग प्रक्रिया आहे, ज्याद्वारे बँक आपल्या ग्राहकांची ओळख पडताळते. फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गुन्हे रोखणं हा त्याचा उद्देश आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकबँक