Join us

ICICI बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा दिली खुशखबर, जाणून घ्या तुम्हाला काय मिळणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 16:50 IST

ICICI Bank Hikes FD Interest Rates : ICICI बँकेने मुदत ठेवींच्या (Fix Deposit) व्याजदरात पुन्हा वाढ केली आहे. आता ही वाढ 0.10 टक्क्यांपर्यंत आहे.

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आयसीआयसीआय (ICICI) बँकेने ग्राहकांना पुन्हा एक आनंदाची बातमी दिली आहे. तुमचे आयसीआयसीआय बँकेत खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ICICI बँकेने मुदत ठेवींच्या (Fix Deposit) व्याजदरात पुन्हा वाढ केली आहे. आता ही वाढ 0.10 टक्क्यांपर्यंत आहे.

यापूर्वी बँकेने व्याजदरात  (Interest Rate) 5-10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. यावेळी बँकेने 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. दरम्यान, यावेळी बँकेने 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या मुदत ठेवींवर दर वाढवले ​​आहेत. यापूर्वी बँकेने मार्चमध्ये व्याजदरात वाढ केली होती आणि नवे दर 22 मार्चपासून लागू झाले होते. यावेळी 10 बेसिस पॉईंटची वाढ 28 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.

कोणत्या कालावधीवर किती व्याज (ICICI Bank FD Interest Rates) (2 कोटी ते 5 कोटींच्या ठेवींवर)

7 दिवस ते 14 दिवस ---- 2.50%, ज्येष्ठ नागरिक ---- 2.50%15 दिवस ते 29 दिवस ----2.50%, ज्येष्ठ नागरिक ----2.50%30 दिवस ते 45 दिवस----2.75%, ज्येष्ठ नागरिक----2.75%46 दिवस ते 60 दिवस----2.75%, ज्येष्ठ नागरिक----2.75%61 दिवस ते 90 दिवस----3.00%, ज्येष्ठ नागरिक----3.00%91 दिवस ते 120 दिवस----3.35%, ज्येष्ठ नागरिक----3.35%

121 दिवस ते 150 दिवस----3.35%, ज्येष्ठ नागरिक----3.35%151 दिवस ते 184 दिवस----3.35%, ज्येष्ठ नागरिक----3.35%185 दिवस ते 210 दिवस ----3.60%, ज्येष्ठ नागरिक ----3.60%211 दिवस ते 270 दिवस ----3.60%, ज्येष्ठ नागरिक ----3.60%271 दिवस ते 289 दिवस ----3.80%, ज्येष्ठ नागरिक ----3.80%290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी ----3.80%, वरिष्ठ नागरिक----3.80%1 वर्ष ते 389 दिवस ----4.35%, ज्येष्ठ नागरिक ----4.35%

390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी ----4.35%, ज्येष्ठ नागरिक----4.35%15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी ----4.45%, ज्येष्ठ नागरिक----4.45%18 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी ----4.60%, ज्येष्ठ नागरिक----4.60%2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे----4.70%, ज्येष्ठ नागरिक----4.70%3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे----4.80%, ज्येष्ठ नागरिक----4.80%5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे----4.80%, ज्येष्ठ नागरिक----4.80%

टॅग्स :आयसीआयसीआय बँकगुंतवणूक