देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेनं रविवारी कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी ६२५ कोटी रुपयांचं दान करण्याची घोषणा केली. टाटा मेमोरियल सेंटरच्या (TMC) नवी मुंबई येथील 'ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च ॲन्ड एज्युकेशन इन कॅन्सर' (Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer) येथे ११ मजली इमारत बांधण्यासाठी होणारा हा खर्च, यापूर्वी घोषित केलेल्या देशभरात तीन सुविधा उभारण्यासाठी केलेल्या १८०० कोटी रुपयांच्या वचनबद्धतेचा भाग असेल.
एका अधिकृत निवेदनानुसार, तळमजला आणि दोन बेसमेंट असलेली ही ११ मजली इमारत ३.४ लाख चौरस फुटांवर पसरलेली असेल आणि यात १२ लिनियर ॲक्सिलरेटर्स (LINACs) तसंच इतर अत्याधुनिक कर्करोग उपचार उपकरणं असतील.
LINACs कर्करोगाच्या पेशींवर अचूकपणे रेडिएशन करतात, ज्यामुळे आजूबाजूच्या हेल्दी टिश्युजचं नुकसान कमी होतं, असंही निवेदनाद्वारे सांगण्यात आलंय. ही नवीन सुविधा २०२७ पर्यंत तयार होईल आणि ती दरवर्षी ७,२०० कर्करोगाच्या रुग्णांना रेडिएशन थेरपी (Radiation Therapies) देईल, ज्यामुळे या रुग्णांना दोन लाखांहून अधिक रेडिएशन सेशन्स उपलब्ध होतील.
याव्यतिरिक्त, या ब्लॉकमध्ये दरवर्षी २५,००० नवीन रुग्णांना ओपीडी सल्लामसलत (OPD consultations) आणि निदान (diagnostics) सुविधा देखील पुरवल्या जातील, असेही त्यात म्हटले आहे.
या इमारतीचा पायाभरणी समारंभ आणि अनावरण सोहळा रविवारी बँकेचे अध्यक्ष प्रदीप कुमार सिन्हा, कार्यकारी संचालक संदीप बत्रा आणि अजय गुप्ता, तसंच टीएमसीचे संचालक सुदीप गुप्ता यांच्या उपस्थितीत पार पडला. याला ज्याला आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी' असं नाव देण्यात आलं आहे.
Web Summary : ICICI Bank pledges ₹625 crore to Tata Memorial Centre for a cancer treatment facility in Navi Mumbai. The 11-story building will house advanced equipment, treating 7,200 patients annually and providing extensive OPD consultations. Expected completion is 2027.
Web Summary : आईसीआईसीआई बैंक ने टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई में कैंसर उपचार सुविधा के लिए ₹625 करोड़ का दान दिया। 11 मंजिला इमारत में उन्नत उपकरण होंगे, जो प्रति वर्ष 7,200 रोगियों का इलाज करेंगे और व्यापक ओपीडी परामर्श प्रदान करेंगे। 2027 तक पूरा होने की उम्मीद है।