Join us

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 14:31 IST

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांचा राजीनामा बँक व्यवस्थापनाने स्वीकारला आहे.

मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांचा राजीनामा बँक व्यवस्थापनाने स्वीकारला आहे. आता चंदा कोचर यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

  व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर कोचर यांची यांची बँकेच्या अंतर्गत समितीमार्फत चौकशी झाली होती. ही चौकशी सुरू असताना चंदा कोचर यांना सक्तीच्या  रजेवर पाठवण्यात आले होते.     

टॅग्स :चंदा कोचरआयसीआयसीआय बँकबँकिंग क्षेत्र