Join us

'हुंडाई अन् किया'ने अमेरिकेत ३४ लाख कार मागवल्या परत, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 10:09 IST

२०१० ते १०१९ या कालावधीतील अनेक कारचे मॉडेल समाविष्ट आहेत. त्यात, हुंडाईची सांता फे एसयुव्ही आणि कियाची सोरेंटो एसयुव्हीही समाविष्ट आहे. 

हुंडाई आणि किया कंपनीने जवळपास ३४ लाख गाड्या परत मागवल्या आहेत. इंजिन कंपार्टमेंटमध्ये आग लागल्याच्या घटनांमुळे रिस्क नको म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपनीने हा निर्णय केवळ अमिरेकेतील ग्राहकांसाठी घेतला आहे. गाडीमालकांनी कंपनीच्या बाहेरच आपली गाडी पार्क करावी, असे आवाहनही कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे. या रिकॉल कारमध्ये २०१० ते १०१९ या कालावधीतील अनेक कारचे मॉडेल समाविष्ट आहेत. त्यात, हुंडाईची सांता फे एसयुव्ही आणि कियाची सोरेंटो एसयुव्हीही समाविष्ट आहे. 

यूएस नॅशनल हाइवे ट्रॅफिक सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनच्या वतीने बुधवारी पोस्ट करण्यात आलेल्या डॉक्यूमेंटमध्ये म्हटले आहे की, एंटी-लॉक ब्रेक कंट्रोल मॉड्यूल तरल पदार्थाचा रिसाव करू शकतो, त्यामुळे इलेक्ट्रिकल शॉर्ट होण्याची शक्यता असते. तर, कार पार्क करताना किंवा गाडी चालवताना आग लागण्याची शक्यता असते. म्हणूनच, या कारच्या ग्राहकांना कंपनीकडून किया आणि हुंडई एंटी-लॉक ब्रेक फ्यूज मोफत बदलून दिले जाणार आहेत.

कियाकडून १४ नोव्हेंबरपासून गाडी मालकांना अँटी-लॉक ब्रेक फ्यूज बदलून देण्यासाठीचे नोटिफिकेशन लेटर पाठवण्यात येईल. तर, हुंडईसाठी २१ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आलीय. हुंडाईने अमेरिकेत अमेरिकेत कारच्या इंजिनिमध्ये आग लागल्याच्या २१ घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे. धूर, जाळ आणि पार्ट वितळण्यासारख्या थर्मल अपघाताच्या २२ घटना घडल्या आहेत. तसेच, कियाने फायर आणि मेल्टिंगच्या १० घटना घडल्याचे नमूद केले आहे. 

सुरक्षेसाठी व्हीकल्सचे रिकॉल ​​​​​​ऑटो कंपनीने म्हटले की, आपल्या ग्राहकांची सुरक्षा प्राधान्याने असल्यामुळेच या कार रिकॉल करण्यात येत आहेत. कारमालक www.nhtsa.gov/recalls या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात. त्यासाठी, आपला १८-अंकी वाहन ओळक क्रमांक नोंद करावा लागणार आहे. त्यामुळे, तुमची कार प्रभावित आहे किंवा नाही, हे समजाणार आहे.

किया मॉडेल ज्या कार रिकॉल केल्या आहेत

बोर्रेगो (2010 ते 2019 मॉडेल), कैडोजा (2014 ते 2016 मॉडेल), फोर्ट, फोर्ट कूप आणि स्पोर्टेज (2010 ते 2013 मॉडेल), K900 (2015 ते 2018 मॉडेल), ऑप्टिमा (2011 ते 2015 मॉडेल), ऑप्टिमा हाइब्रिड आणि सोल (2011 ते 2013 मॉडेल), रियो (2012 ते 2017 मॉडेल), सोरेंटो (2011 ते 2014 मॉडेल), रोंडो (2010 ते 2011 मॉडेल).

हुंडाई मॉडेल ज्या कार रिकॉल केल्या आहेत

एलांट्रा, जेनेसिस कूप आणि सोनाटा हाइब्रिड (2011 ते 2015 मॉडेल), एक्सेंट, अज़ेरा आणि वेलोस्टर (2012 ते 2015 मॉडेल), एलांट्रा कूप आणि सांता फ़े (2013 ते 2015 मॉडेल), इक्वस (2014 ते 2015 मॉडेल), वेराक्रूज़ (2010 ते 2012 मॉडेल), टूशॉ (2010 ते 2013), 2015 टूशॉ फ्यूल सेल आणि 2013 सांता फ़े स्पोर्ट मॉडेल.

टॅग्स :कारह्युंदाईकिया मोटर्स