Join us

पतीच्या व्यावसायिक व्यवहारांची माहिती नव्हती; चौकशीत चंदा कोचर यांचा जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:52 IST

व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेने ही मोठी कर्जे दिली, तेव्हा चंदा कोचर या बँकेच्या सीईओ होत्या.

नवी दिल्ली : व्हिडिओकॉन उद्योग समूहाला सहा मोठी कर्जे मंजूर केली तेव्हा आपले पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे एमडी वेणुगोपाल धूत यांच्यातील व्यावसायिक व्यवहारांची आपणास कोणतीही माहिती नव्हती, असा जबाब आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी चौकशीदरम्यान दिला आहे.व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेने ही मोठी कर्जे दिली, तेव्हा चंदा कोचर या बँकेच्या सीईओ होत्या. ३०० कोटी रुपयांचे एक कर्ज व्हिडिओकॉन समूहाला अदा झाल्यानंतर दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्यूएबल्स कंपनीला व्हिडिओकॉन समूहाने ६४ कोटींचे कर्ज दिले होते. ही कोचर यांना देण्याात आलेली लाचच होती, असा सीबीआयचा आरोप आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चंदा कोचर यांनी सांगितले की, बँकेशी संबंधित कामाची मी माझ्या पतीसोबत कधीही चर्चा करीत नव्हते. माझे पतीही त्यांच्या व्यवसायाबाबत माझ्याशी चर्चा करीत नसत. त्यामुळे बँकेच्या कर्जाच्या बदल्यात काही घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.तपासात असे आढळून आले की, धूत यांनी दीपक कोचर यांना मॉरिशसमधील एका कंपनीमार्फत पैसे दिले होते. या व्यवहाराची माहिती मॉरिशस सरकारकडून मागविलीआहे.

टॅग्स :चंदा कोचरआयसीआयसीआय बँक