Join us  

'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 3:00 PM

IPO News: लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीच्या शेअर्सने ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला. आयपीओचा प्राइस बँड १२३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.

IPO News: फायनलिस्ट टेक्नॉलॉजीच्या आयपीओचं (Finelistings Technologies IPO Listing) आज शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झालं. कंपनी बीएसई एसएमईवर ३.२५ टक्के प्रीमियमसह १२७ रुपयांवर लिस्ट झाली. त्यानंतर लगेचच कंपनीच्या शेअर्सने ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला. आयपीओचा प्राइस बँड १२३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.

आज सकाळी कंपनीचा शेअर १२७ रुपयांवर लिस्ट झाला. पण काही काळानंतर कंपनीच्या शेअरची किंमत ५ टक्क्यांनी वाढून १३३.३५ रुपयांवर पोहोचली. त्यामुळे पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ८.४१ टक्क्यांचा नफा झाला. लिस्टिंग नंतर कंपनीचे मार्केट कॅप ४८.४९ कोटी रुपये होते. 

कधी उघडलेला आयपीओ? 

कंपनीच्या आयपीओ ७ मे रोजी खुला झाला होता. तर हा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ९ मेपर्यंत खुला होता. कंपनीनं तब्बल १००० शेअर्सचा लॉट बनवला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १ लाख २३ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. फायनलिस्ट टेक्नॉलॉजीजचा आयपीओची साईज १३.५३ कोटी रुपये होती. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून ११ लाख नवे शेअर्स जारी केले आहेत. 

कंपनीचे प्रवर्तक अनिश माथुर आणि अर्जुन सिंग राजपूत आहेत. आयपीओपूर्वी दोन्ही प्रवर्तकांकडे ७१.३६ टक्के हिस्सा होता. आयपीओनंतर तो आता ४९.९८ टक्क्यांवर आला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार