Join us

व्याजदर स्वस्त झाले तर कमाई कशी कराल? रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष, बाजाराला मिळू शकते उभारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 06:01 IST

Business: नवीन आर्थिक वर्षामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरांबाबतचा निर्णय या सप्ताहात होणार असून, त्याकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. त्या जोडीलाच विविध प्रकारची आर्थिक आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांची काय भूमिका राहणार, यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे.

- प्रसाद गो. जोशीनवीन आर्थिक वर्षामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरांबाबतचा निर्णय या सप्ताहात होणार असून, त्याकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. त्या जोडीलाच विविध प्रकारची आर्थिक आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांची काय भूमिका राहणार, यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे. याचबरोबर अमेरिकेतील व्याजदरांवरही बाजार लक्ष ठेवून आहे. व्याजदर स्वस्त झाले तर कोणत्या कंपन्या फायद्याच्या ठरतील, यावर गुंतवणूकदारांना लक्ष ठेवावे लागेल. 

बुधवारपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणविषयक समितीची बैठक होत असून, त्यामध्ये आगामी काळासाठीच्या व्याजदरांबाबत निर्णय होणार आहे. व्याजदरांमध्ये काहीशी घट झाल्यास बाजाराला अधिक उभारी मिळू शकेल. पीएमआय, वाहन विक्री याबाबतची आकडेवारीही जाहीर होणार आहे.

याच सप्ताहात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडूनही व्याजदरांबाबत घोषणा होणार आहे. फेडरल रिझर्व्हने या वर्षामध्ये तीन वेळा व्याजकपात करण्याची घोषणा याआधीच केली आहे. त्यामुळे ही व्याजकपात केव्हा होणार याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. ही घोषणा झाल्यास जगभरातील शेअर बाजार वाढतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर तसेच डॉलरचे दर यावरही बाजार वर-खाली होऊ शकतो.२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये दिले चांगले रिटर्ननिर्देशांक    अंकातील वाढ    टक्केसेन्सेक्स    १४,६५९.८३    २४.८५%निफ्टी    ४९६७.१५    २८.६१%१२८ लाख कोटी रुपयांनी वाढले बाजार भांडवल 

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारभारतीय रिझर्व्ह बँक