Join us
Daily Top 2Weekly Top 5

द्यावी कशी पेन्शन? अमेरिकेलाही टेंशन; श्रीमंत देशही पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 07:43 IST

विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासांचा एकत्र गोषवारा रिझर्व्ह बँकेच्या अहवालात देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर लाखो कर्मचारी गोळा झालेले असतानाच रिझर्व्ह बँकेने एक अहवाल जारी करून जगातील अमेरिकेसारखे श्रीमंत देशही पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने हैराण असल्याचे नमूद केले आहे.

विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासांचा एकत्र गोषवारा रिझर्व्ह बँकेच्या अहवालात देण्यात आला आहे. त्यानुसार, जगातील प्रमुख २० श्रीमंत देशांत पेन्शनची अदायगी करण्यासाठी ७८ लाख कोटी डाॅलरची तूट आहे. हा पैसा कसा उभा करायचा हा या देशांपुढील प्रश्न आहे.

आशियातील फिलीपिन्स, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांत सरकारी खर्चाची पेन्शन आहे. मात्र, चीन, श्रीलंका, भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर या देशांनी कर्मचाऱ्यांच्या योगदानावर आधारित पेन्शन लागू केली आहे.

टॅग्स :निवृत्ती वेतन