Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या बनवता येईल रेशन कार्ड! ई-केवायसी देखील होईल चुटकीसरशी, अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:04 IST

Ration Card : तुम्हीही नवीन रेशन कार्ड बनवण्याचा विचार करत आहात का? तुम्ही हे काम आता घरबसल्या मोबाईलवरुन करू शकता.

Ration Card : भारत सरकारकडून मिळणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये रेशन कार्डचा समावेश होतो. गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे खूप महत्त्वाचे दस्तावेज आहे, कारण या माध्यमातूनच गहू, तांदूळ, साखर आणि डाळींसारख्या वस्तू अत्यंत कमी दरात मिळतात. आता याच रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयासमोर लांब रांगा लावण्याची गरज नाही! सरकारने नागरिकांना उमंग ॲपद्वारे घरी बसूनच रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

घरी बसून ऑनलाइन रेशन कार्ड बनवाज्या लोकांना सरकारी कार्यालयात जाणे शक्य नसते (उदा. दूर-दराजच्या भागातील नागरिक), त्यांच्यासाठी उमंग ॲपद्वारे मोबाईलवर राशन कार्ड बनवण्याची ही सुविधा अत्यंत फायद्याची आहे.

ऑनलाइन राशन कार्ड बनवण्याची सोपी प्रक्रिया

  1. सर्वप्रथम, तुमच्या मोबाईलमध्ये उमंग ॲप डाऊनलोड करा आणि आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा.
  2. ॲप उघडून 'युटिलिटी सर्व्हिस' या विभागात जा.
  3. यानंतर 'अप्लाय रेशन कार्ड' या पर्यायावर क्लिक करा.
  4. ही सुविधा सध्या काहीच राज्यांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे प्रथम आपल्या राज्याचे नाव सूचीमध्ये तपासा.
  5. आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल. त्यात आपले नाव, वडील/पतीचे नाव, पत्ता आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या यासारखी सर्व माहिती अचूक भरा.
  6. अर्ज पूर्ण भरल्यानंतर आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड यांसारखी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  7. फॉर्म सबमिट करताच तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही आपल्या अर्जाचे स्टेटस ऑनलाइन तपासू शकता.
  8. तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यास, रेशन कार्ड पोस्टाद्वारे तुमच्या घरी पाठवले जाईल किंवा तुम्ही ते ऑनलाइन डाऊनलोडही करू शकता.

ऑफलाइन प्रक्रिया आणि ई-केवायसी

जे लोक ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत, ते त्यांच्या जवळच्या ई-सेवा केंद्र, खाद्य विभाग कार्यालय, तहसील किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून राशन कार्डसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही ऑनलाइन अर्ज करत असाल वा ऑफलाइन, फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरणे अनिवार्य आहे, जेणेकरून तुमचा अर्ज फेटाळला जाणार नाही.

वाचा - Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!

सरकारने आता रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. जर ई-केवायसी केली नाही, तर तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा बंद होऊ शकतात. तुम्ही रेशन कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर/रेशन डीलरच्या दुकानावर जाऊन केवायसी पूर्ण करू शकता. 

टॅग्स :सरकारी योजनासरकारअन्न