Join us  

'हा' व्यवसाय सुरू केल्यास तुम्हीही करू शकता दरमहा लाखोंची कमाई! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 11:13 AM

business : डेअरी प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी अमूलसोबत व्यवसाय करू शकता. या व्यवसायासाठी लहान गुंतवणूकींमध्ये दरमहा नियमित गुंतवणूक करता येते.

ठळक मुद्देअमूलची फ्रँचायझी घेणे फायदेशीर आहे. यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमी आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्यास तयार असला तर तुमच्यासाठी एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्याची सुरुवात तुम्ही पहिल्या दिवसापासूनच करू शकता. डेअरी प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी अमूलसोबत व्यवसाय करू शकता. या व्यवसायासाठी लहान गुंतवणूकींमध्ये दरमहा नियमित गुंतवणूक करता येते. अमूलची फ्रँचायझी घेणे फायदेशीर आहे. यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. (how to start dairy products business in india with amul franchise know how you can earn lakhs every month)

फक्त 2 लाखांपासून सुरू करू शकता व्यवसायअमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी खर्च सुद्धा जास्त नाही. तुम्ही 2 ते 6 लाख रुपये खर्च करून हा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरूवातीला चांगला नफा मिळू शकेल. फ्रँचायझीद्वारे दरमहा सुमारे 5 ते 10 लाख रूपये विकले जाऊ शकतात. हे जागेवर सुद्धा अवलंबून असते.

कशी फ्रेंचायझी घेता येईल?अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचायझी देत ​​आहे. सगळ्यात आधी अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्क फ्रँचायझी आणि दुसरं अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर फ्रेंचायझी. पहिल्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर दुसर्‍या फ्रेंचायझी घेण्याचा विचार करत असाल तर 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये परत न करण्यायोग्य ब्रँडची सुरक्षा म्हणून द्यावी लागणार आहे.

किती मिळेल कमिशन?अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी कमीतकमी विक्री किंमतीवर म्हणजे अमूल उत्पादनांच्या एमआरपीची कमिशन देते. दुधाच्या थैलीवर 2.5 टक्के, दुधाच्या उत्पादनांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरच्या फ्रेंचायझीला रेसिपी आधारित आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 % कमिशन मिळते. त्याचबरोबर कंपनी प्री-पॅक केलेल्या आईस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रॉडक्ट्सवर 10 टक्के कमिशन देते.

जागेची आवश्यकताजर तुम्ही अमूलचे दुकान घेतले तर तुमच्याकडे 150 चौरस फूट जागा असावी. त्याच वेळी अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रेंचायझीसाठी किमान 300 चौरस फूट जागा असावी.

कसा करणार अर्ज ?जर तुम्हाला फ्रेंचायझीसाठी अर्ज करायचा असेल तर थेट retail@amul.coop वर मेल करावा लागेल. याशिवाय तुम्ही http://amul.com/m/amul-scooping-parlours या लिंकवर जाऊनही माहिती मिळवू शकता.  

टॅग्स :व्यवसायपैसादूध