Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या गुरुजींचं मानधन किती? अंबानी फॅमिलीशी आहे जुनं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 10:14 IST

Anant Ambani Radhika Merchant Wedding : रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका अंबानी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका अंबानी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या या विवाहाशी निगडीत प्रत्येक गोष्टींची चर्चा होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाचे सर्व विधी पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडले. गुजरातमधील जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनलादेखील चंद्रशेखर शर्मा उपस्थित होते. विमानतळाबाहेर येताच अंबानी आणि मर्चंट यांच्या टीमनं त्यांचं स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कोण आहेत पंडित चंद्रशेखर शर्मा आणि ते किती मानधन घेतात, जाणून घेऊया.

पंडित चंद्रशेखर शर्मा यांनी आपल्या फेसबुक हँडलवर अंबानींच्या सेलिब्रेशनमध्ये आपल्या उपस्थितीची झलक शेअर केली आहे. अंबानी कुटुंबानं अँटिलियामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव आयोजित केला तेव्हाही त्यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून एक फोटो शेअर केला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई इंडियन्स फॅमिलीसोबत एक फोटोही पोस्ट केला होता. यात नीता अंबानी, राधिका मर्चंट, आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि अन्य लोकही होते.

पर्सनल कोच आणि मोटिव्हेटरही

पंडित चंद्रशेखर शर्मा हे पर्सनल कोट आणि लाइफस्टाइल मोटिव्हरही आहेत याची माहिती त्यांच्या फेसबुक वॉलरून मिळते. त्यांची अधिकृत वेबसाइट pujahoma.com नुसार, ते एक आध्यात्मिक मार्गदर्शकही आहेत. वैवाहिक विधींसाठी पंडित शर्मा हे सामग्रीसह २५ हजार रुपये घेत असल्याची माहिती अधिकृत वेबसाईटवरुन समोर आली आहे.

टॅग्स :व्यवसायअनंत अंबानी