Join us

मॉर्निंग वॉकएवढ्या राईडचे बिल किती? ७.६६ कोटी रु.!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 05:51 IST

App Taxi Bill: ॲप टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना अनेकदा भरमसाट बिले आल्याचे पाहायला मिळते. परंतु, नोएडा येथील प्रवाशाला एका लहानशा ट्रीपचे तब्बल ७.६६ कोटी रुपयांचे बिल आहे. राईड बुकिंग करतेवेळी प्रवाशाला केवळ ६२ रुपयांचे बिल दाखवण्यात आले. 

नवी दिल्ली - ॲप टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना अनेकदा भरमसाट बिले आल्याचे पाहायला मिळते. परंतु, नोएडा येथील प्रवाशाला एका लहानशा ट्रीपचे तब्बल ७.६६ कोटी रुपयांचे बिल आहे. राईड बुकिंग करतेवेळी प्रवाशाला केवळ ६२ रुपयांचे बिल दाखवण्यात आले. 

शुक्रवारी सकाळी दीपक तेंगुरिया यांनी ॲप टॅक्सी बुक केली. प्रवास संपल्यानंतर टॅक्सीतून बाहेर पडताच त्यांना ७,६६,८३,७६२ रुपयांचे बिल मोबाइलवर मिळाले. यात प्रवासाचे शुल्क १,६७,७४,६४७ रुपये आहे, तर वेटिंग चार्ज ५,९९,०९,१८९ रुपये इतका आहे. त्यावेळी ड्रायव्हरशी झालेल्या संवादाचा व्हिडीओ दीपक यांनी एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ॲप कंपनीने प्रवाशांची माफी मागून या प्रकरणाची चौकशी करू असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :टॅक्सीदिल्ली