Join us

पगारानुसार तुम्ही किती लाखांची कार घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 11:18 IST

कार खरेदीसाठी एक साधा नियम आहे तो म्हणजे तुमच्या वार्षिक पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा महागडी कार घेऊ नये. मासिक पगाराच्या १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम हप्त्यांवर खर्च करू नये. यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, गुंतवणूक आणि इतर गरजा यावर परिणाम होत नाही. गृहकर्जाचे ओझे अगोदरच असते, ते वेगळे.

चंद्रकांत दडस,

वरिष्ठ उपसंपादक

सरकारने १२०० सीसीपर्यंतच्या कारवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला असल्याने कार खरेदी करताना हजारो रुपये वाचणार आहेत. त्यामुळे अनेक जण कार खरेदीसाठी इच्छुक झाले आहेत. कार खरेदी करणे ही प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट असते; पण अनेकदा उत्साहात आपण आपल्याला झेपणार नाही अशी कार घेतो आणि नंतर ईएमआयचा बोजा जाणवू लागतो. त्यामुळे कार घेताना पहिला विचार करावा तो आपल्या पगारानुसार गाडीची किंमत किती असावी याचा.

कार खरेदीसाठी एक साधा नियम आहे तो म्हणजे तुमच्या वार्षिक पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा महागडी कार घेऊ नये. मासिक पगाराच्या १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम हप्त्यांवर खर्च करू नये. यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, गुंतवणूक आणि इतर गरजा यावर परिणाम होत नाही. गृहकर्जाचे ओझे अगोदरच असते, ते वेगळे.

आजकाल बँका सहज कर्ज देत आहेत. त्यामुळे महागडी कार घेणे सोपे वाटते; पण फक्त कर्ज मिळतेय म्हणून महागडी कार घेऊ नये. भविष्यातील आर्थिक नियोजन, कारची खरेच गरज आहे का, नोकरीची स्थिरता आणि अचानक येणारे खर्च हे सर्व लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा.

लक्षात ठेवा, गाडी ही संपत्ती नसून खर्चीक मालमत्ता आहे. ती घेतल्यानंतर तिची किंमत दरवर्षी कमी होत जाते. त्यामुळे आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहून गाडी घेणे हेच योग्य ठरते. अन्यथा गाडी विकण्याची वेळ येते.

पगारानुसार कार खरेदी

मासिक  कारची  मासिक

पगार   योग्य किंमत   हप्ता

२५,००० १.५ लाखपर्यंत   ५,०००

५०,००० ३ लाखपर्यंत     १०,०००

१,००,०००       ६ लाखपर्यंत     २०,०००

१,५०,०००       ९ लाखपर्यंत     ३०,०००

टॅग्स :कार