Join us  

तुमच्या Aadhaar Card वरून कोणी सिमकार्ड तर घेतलं नाही ना?, घरबसल्या 'असं' करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 5:28 PM

Aadhaar Card : सध्या आधार कार्ड आहे सर्वांसाठी आवश्यक डॉक्युमेंट. अनेक ठिकाणी आधार कार्ड असणं झालंय आवश्यक.

ठळक मुद्देसध्या आधार कार्ड आहे सर्वांसाठी आवश्यक डॉक्युमेंट.अनेक ठिकाणी आधार कार्ड असणं झालंय आवश्यक.

Aadhaar Card update: सध्या आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक झआलं आहे. याच्याशिवाय बऱ्याचशा कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. बँक, रेशन, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन इतकंच काय तर लसीकरणासाठीही आधार क्रमांकाचा वापर केला जातो. परंतु अन्य कोणती व्यक्ती तुमच्या या आधार क्रमांकाचा गैरवापर तर करत नाहीये ना हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. तुमच्या आधार कार्डावर सिमकार्ड किंवा अन्य कोणत्या योजनांचा वापर केला जातोय का हेदेखील आता तुम्ही माहित करून घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्डाशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे. 

सर्वप्रथम तुम्हाला  https://resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये असलेल्या आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या  'Generate OTP'  या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. UIDAI वेबसाईटवर तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर असणं आवश्यक आहे. ओटीपी एन्टर केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. दरम्यान, त्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशनची तारीख, वेळ आणि प्रकार समजेल. परंतु त्यासाठी कोणी अर्ज केला आहे याची माहिती मिळणार नाही.

एका आधारवर १८ सिमकार्डयापूर्वी एका आधारकार्ड क्रमांकावर ९ सिमकार्ड खरेदी करता येत होते. परंतु दूरसंचार नियामक मंडळाच्या (TRAI) च्या नव्या नियमांनंतर १८ सिमकार्ड एका आधार कार्डावर खरेदी करण्याची परवानगी आहे. काही लोकांना व्यवसायासाठी सिमकार्डची गरज असते, यासाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

 

टॅग्स :मोबाइलआधार कार्डपॅन कार्डइंटरनेट