Join us

कशी झाली Kalyan Jewellersची सुरुवात? १२ व्या वर्षी काम करणाऱ्या एका मुलानं उभी केली कोट्यवधींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:29 IST

Kalyan Jewellers Success Story: कल्याण ज्वेलर्सचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. कल्याण ज्वेलर्स हा भारतातील सर्वात लोकप्रिय ज्वेलरी ब्रँडपैकी एक आहे. कल्याण ज्वेलर्सची देशभरात सुमारे २७७ दुकानं आहेत.

Kalyan Jewellers Success Story: कल्याण ज्वेलर्सचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. कल्याण ज्वेलर्स हा भारतातील सर्वात लोकप्रिय ज्वेलरी ब्रँडपैकी एक आहे. कल्याण ज्वेलर्सची देशभरात सुमारे २७७ दुकानं आहेत. त्याचबरोबर कल्याण ज्वेलर्सचे मार्केटिंग बड्या स्टार्सनीही केलंय. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, कतरिना कैफ आणि रश्मिका मंदाना सारख्या स्टार्सचा समावेश आहे. कल्याण ज्वेलर्सच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचं झाले तर ते एकूण ५३,७०३ कोटींच्या जवळ आहे, परंतु कल्याण ज्वेलर्सची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का?

कल्याण ज्वेलर्सचे मालक कोण?

कल्याण ज्वेलर्सची सुरुवात १९९३ साली टी. एस. कल्याणरमण यांनी केली. ७७ वर्षीय टी. एस. कल्याणरमण हे कल्याण ज्वेलर्सचे एमडी आहेत. टी. एस. कल्याणरामन वयाच्या १२ व्या वर्षापासून कार्यरत आहेत. पूर्वी ते आपल्या कुटुंबाच्या कापड व्यवसायात काम करायचे. वयाच्या १२ व्या वर्षापासून १९९३ पर्यंत टी. एस. कल्याणरामन यांनी कौटुंबीक व्यवसायात काम केलं. पुढे त्यांनी कौटुंबीक व्यवसाय सोडून स्वत:ची ज्वेलरी चेन चेन सुरू करण्याचा निर्णय घेतला.

टी. एस. कल्याणरमण यांच्या आजोबांनी एका दुकानातून कापडाचा व्यवसाय सुरू केला होता. कल्याण ज्वेलर्स सुरू केल्यानंतर २०१४ मध्ये वारबर्ग पिंकसनं यात गुंतवणूक केली, ७ वर्षांनंतर म्हणजेच २०२१ मध्ये ही कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली.

टी. एस. कल्याणरमण यांची नेटवर्थ

टी. एस. कल्याणरमण यांचे नाव देशातील श्रीमंतांच्या यादीत आहे. त्यांची नेटवर्थ ३.८ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ३२,९६४ कोटी रुपये आहे.

टॅग्स :दागिनेव्यवसाय