Join us  

घर खरेदी, कर्ज आजपासून होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:06 AM

नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात । वीज, वाहन, घरगुती सिलिंडरच्या किमती वाढणार

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षात नवनव्या आर्थिक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी समितीने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. तथापि, वाहन आणि घरगुती सिलिंडर मात्र महाग होणार आहे. तसेच, प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डच्या नियमात तीन मोठे बदल केले आहेत. ज्या व्यक्तींकडे १२५ सीसीहून जास्त पॉवरची दुचाकी असेल त्यात अँटी लॉक सिस्टिम असणे आवश्यक असणार आहे.कोणत्या सेवा होणार स्वस्त?जीएसटीच्या बदललेल्या कर रचनेमुळे घर बांधकामासाठी आवश्यक असलेले सिमेंट वगळता इतर वस्तूंवर जीएसटी कमी केल्याने घर खरेदी करणे स्वस्त होणार आहे. शिवाय बांधकाम अपूणई असलेल्या घरांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के तर परवडणाऱ्या घरांच्या वर्गात मोडणाऱ्या घरांवरील जीएसटी ८ टक्क्यांवरून १ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे घरे स्वस्त होतील.विमा कंपन्यांनाही जीएसटीच्या नव्या दराची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे विमा संरक्षण घेणे स्वस्त होणार आहे. २२ ते ५० वयोगटातील व्यक्तींना याचा फायदाय होणार आहे.रेल्वेचे तिकीट काढल्यानंतररेल्वे चुकल्यास तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत किंवा त्याच तिकिटात दुसºया रेल्वेने प्रवास करता येणार आहे.आता रेपो रेट घटल्यास व्याजदरातही घट होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याने या टप्प्यात येणाऱ्यांना प्राप्तिकर भरावा लागणार नाही.नोकरी बदलल्यानंतर कर्मचाºयांना कोणताही अर्ज करावा लागणार नाही. तुमचा ईपीएफ नवीन कंपनीत थेट ट्रान्सफर करता येणार आहे.कोणत्या सेवा महाग?१ एप्रिलपासून सीएनजी गॅसच्याकिंमतीत १८ टक्के वाढ होणार आहे.सर्वच वाहनांच्या सुट्या भागांच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.पाइपलाइनमधून पुरवठा करण्यात येणाºया गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. घरगुती सिलिंडरचे दरही वाढू शकतात.पुढील तीन वर्षात स्मार्ट प्रीपेड मीटरनेच वीज पुरवठा करावा लागणार आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंतची मुदत दिली आहे. मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असतील. त्यात शिल्लक रक्कम असेपर्यंत वीज वापरता येईल. ती संपताच वीजपुरवठा बंद होईल आणि कार्ड रिचार्ज होताच तो सुरु होईल.

टॅग्स :घर