Join us

सुरक्षिततेसह High Return : ज्येष्ठ नागरिकांसाठी FD पेक्षा उत्तम आहे पोस्ट ऑफिसची ही स्कीम, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:30 IST

ज्येष्ठ नागरिकांना त्यांची बचत अशा ठिकाणी करणे आवडते, जिथे त्यांना चांगले परतावा मिळू शकेल आणि त्यांचे पैसेही सुरक्षित असतील.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांची बचत अशा ठिकाणी करणे आवडते, जिथे त्यांना चांगले परतावा मिळू शकेल आणि त्यांचे पैसेही सुरक्षित असतील. यामुळे, बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा कल एफडीकडे असतो. अशा लोकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme- SCSS) खूप उपयुक्त ठरू शकते.

सरकारची ही स्कीम विशेषतः अशा लोकांसाठी आहे, ज्यांचं वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. याशिवाय ज्यांनी व्हीआरएस घेतली आहे तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मुदत ठेवी आणि बचत खात्यांच्या तुलनेत याचा व्याजदर खूपच चांगला आहे. सध्या, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.2 टक्के दरानं व्याज मिळत आहे. चला जाणून घेऊया या योजनेशी संबंधित काही खास गोष्टी.

5 वर्षांत मॅच्युअर होते स्कीमया खात्यात किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. योजनेत रक्कम 1000 च्या पटीत जमा केली जाते. जमा रकमेवर तिमाही आधारावर व्याज दिलं जातं. खाते उघडल्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी जमा रक्कम मॅच्युअर होते. ठेवीदाराची इच्छा असल्यास, रक्कम मॅच्युअर झाल्यानंतरही तीन वर्षांसाठी खात्याची मुदत वाढवू शकतो. परंतु हा पर्याय एकदाच उपलब्ध आहे.

5, 10, 15, 20 आणि 30 लाखावर किती व्याज जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर 8.2 टक्के दरानं तुम्हाला 2,05,000 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर 7,05,000 रुपये मिळतील. 10 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला मॅच्युरिटीवर 14,10,000 रुपये मिळतील, 15 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला मॅच्युरिटीवर 21,15,000 रुपये मिळतील, 20 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला 28,20,000 रुपये आणि 30 लाख रुपये जमा केल्यानंतर मॅच्युरिटीवर 42,30,000 रुपये मिळतील.

स्कीमचे फायदे

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारद्वारे समर्थित एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. म्हणून ती विश्वसनीय आणि सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते.
  • हे खाते भारतात कुठेही हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून प्रति वर्ष 1.5 लाख रुपयांच्या कर सूटचा दावा करू शकता.
  • या योजनेंतर्गत दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते. प्रत्येक एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाते.
टॅग्स :ज्येष्ठ नागरिकपोस्ट ऑफिस