Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल पाच दिवस कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 04:16 IST

अगुस्ता वेस्टलँड या इटालियन कंपनीची हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ््यातील ब्रिटिश दलाल ख्रिश्चन मायकेल यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला.

नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड या इटालियन कंपनीची हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ््यातील ब्रिटिश दलाल ख्रिश्चन मायकेल यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला. संयुक्त अरब अमिरातींमधून प्रत्यार्पण करून मंगळवारी रात्री दिल्लीत आणलेल्या मायकेल याला न्या. अरविंद कुमार यांच्यापुढे उभे केले गेले.सीबीआयने रिमांडसाठी तर मायकेल यांनी जामिनासाठी अर्ज केला. या घोटाळ्यात सरकारचे २,६६६ कोटींचे नुकसान झाले, असा सीबीआयचा दावा आहे. माजी हवाईदलप्रमुख एस. पी. त्यागी व एअर मार्शल जे. एस. गुजराल यांच्याखेरीज तीन दलालांसह आठ आरोपी आहेत. ग्युडो हाश्चके व कार्लो गेरोसा हे दोन आरोपी दलाल फरार आहेत.

टॅग्स :ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा