Join us  

HDFC ग्राहकांची चांदी! आजपासून मुदत ठेवींबाबत 'हा' मोठा बदल लागू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:43 PM

HDFC Bank Latest FD Interest Rates : बँकेने मुदत ठेवीच्या (FD Rates) दरात पुन्हा बदल केला आहे. नवे दर 20 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) ग्राहकांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी देण्यात आली आहे. बँकेने मुदत ठेवीच्या (FD Rates) दरात पुन्हा बदल केला आहे. नवे दर 20 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. नवीन दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू होतील.

बँकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना 7 ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50  टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय बँक 30 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज देत आहे. नवीन बदलानंतर एचडीएफसी बँक 91 दिवस ते 6 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 3.50 व्याज देत आहे.

कमाल व्याज दर 5.60 टक्केबँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसापासून ते दोन वर्षांच्या कालावधीत म्यॅच्योर होणाऱ्या मुदत ठेवींवर 5.10 टक्के दराने व्याज दिले जाईल. दोन वर्षे 1 दिवस तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.20 टक्के व्याजदर आहे. याचबरोबर, तीन वर्षे 1 दिवस ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.45 टक्के व्याजदर आणि पाच वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.60 टक्के व्याजदर मिळेल.

मुदत ठेवींवरील व्याज दर 20 एप्रिलपासून लागू (HDFC Bank latest FD interest rates effective from 20 April 2022)

7 ते 14 दिवस: 2.50%15 ते 29 दिवस : 2.50%30 ते 45 दिवस: 3%61 ते 90 दिवस: 3%91 दिवस ते 6 महिने: 3.5%6 महिने 1 दिवस ते 9 महिने: 4.4%9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष : 4.40%1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे : 5.10%2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे : 5.20%3 वर्षे ते 1 दिवस 5 वर्षे : 5.45%5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे : 5.60%

टॅग्स :एचडीएफसीगुंतवणूक