Join us  

HDFC Bank: दुकानदारांसाठी खुशखबर! फक्त बँक स्टेटमेंटवर मिळणार 10 लाखांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट; बिना गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 7:38 PM

HDFC Bank New Scheme Shopkeepers: कोणत्याही बँकेचे 6 महिन्यांचे स्टेटमेंट लागणार आहे. हे स्टेटमेंट बँकेला दाखविल्यावर त्या दुकानदाराला 50 हजारे ते 10 लाखांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळणार आहे. कोणतीही गोष्ट तारण ठेवावी लागणार नाही, तसेच आयटीआर देखील लागणार नाही. 

जर तुम्ही दुकानदार (Shopkeepers) असाल आणि जर तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी पैशांची गरज असेल तर एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. एचडीएफसी बँकेने स्पेशल पर्पज व्हेईकल सीएससीसोबत मिळून ओव्हरड्राफ्टची स्कीम सुरु केली आहे. या स्कीमला दुकानदार ओव्हरड्राफ्ट स्कीम असे नाव देण्यात आले आहे. (HDFC Bank New Scheme; Shopkeepers Will Get Overdraft Of 10 Lakh Rupees)

LIC चा नवा प्लॅन! आता म्हातारपणी नाही, 40 व्या वर्षीच पेन्शन चालू होणार

या योजनेनुसार रिटेलर्स, दुकानदार आणि गावागावातील व्यावसायिक ही ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकणार आहेत. तीन वर्षांहून अधिक काळ व्यवसाय असला पाहिजे. तसेच कोणत्याही बँकेचे 6 महिन्यांचे स्टेटमेंट लागणार आहे. हे स्टेटमेंट बँकेला दाखविल्यावर त्या दुकानदाराला 50 हजारे ते 10 लाखांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे ही सुविधा घेण्यासाठी दुकानदारांना कोणतीही गोष्ट तारण ठेवावी लागणार नाही, तसेच आयटीआर देखील लागणार नाही. 

छोट्या व्यावसायिकांसाठी खास ही स्कीम बनविण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने म्हटले की, छोट्या छोट्या दुकानदारांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कमीतकमी कागदपत्रांचा पर्याय ठेवण्यात आला आहे. सध्याच्या संकटाला पाहून छोट्या दुकानदारांसाठी ही स्कीम तयार करण्यात आली आहे. 

जाणून घ्या स्कीमचे दोन भाग...ही स्कीम दोन भागात वाटण्यात आली आहे. पहिल्या भागात 6 वर्षांपेक्षा कमी काळ व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना घेण्यात आले आहे. या दुकानदारांना बँक स्टेटमेंटच्या आधारावर 7.5 लाखांपर्यंत ओव्हरड्राफ्ट दिला जाईल. दुसऱ्या भागात 6 वर्षांपेक्षा जास्त काळापासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचा समावेश आहे. या दुकानदारांना 10 लाखांपर्यंत ओव्हरड्राफ्ट दिला जाईल. 

टॅग्स :एचडीएफसीव्यवसाय