Join us

'मेहनत, मेहनत, मेहनत अन्...'; गौतम अदानींनी सांगितला श्रीमंतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 11:29 IST

अदानी यांची नुकतीच टीव्हीवर पत्रकार रजत शर्मा यांनी मुलाखत घेतली.

अल्पावधीत जगभरात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचलेले गौतम अदानी यांनी त्यांच्या या यशाचे रहस्य एका मुलाखतीत सांगितले असून, त्या मुलाखतीतील काही भाग व्हायरल होत आहे. 

अदानी यांची नुकतीच टीव्हीवर पत्रकार रजत शर्मा यांनी मुलाखत घेतली. इतकी संपत्ती कमावण्याचा, इतके श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला काय?, असा प्रश्न शर्मा यांनी विचारल्यावर ‘‘मेहनत, मेहनत और मेहनत, परिवार का साथ और उपरवाले का आशीर्वाद” असे अदानी म्हणाले. शर्मा यांनी हे उत्तर ट्विटरवर शेअर केले आणि लगेचच त्या ट्वीटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून नेटिझन्स त्याखाली विविध प्रतिक्रिया देत आहेत. 

रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांच्यासोबत वैर असल्याच्या प्रश्नावर, “ते माझे मित्र आहेत. मी त्यांचा आदर करतो, त्यांनी रिलायन्सला नवीन दिशा दिली, देशाच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान आहे,” असे अदानी म्हणाले. तसेच, धीरूभाई अंबानी माझे रोल मॉडल असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय