Join us

कंपन्यांकडूनही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना अन् विशेष प्रशिक्षण; प्रवासाबाबत नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 05:04 IST

एका मोठ्या उत्पादक कंपनीने जर्मनीला अधिकृत दौ-यावर गेलेल्या आपल्या वरिष्ठ व्यवस्थापकांना १४ दिवस घरीच थांबण्यास सांगितले आहे.

मुंबई : कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असल्यामुळे भारतातील बहुतांश मोठ्या कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेषत: प्रवास करणाºया कर्मचाºयांसाठी काही नियम कंपन्या बनवीत आहेत. एका मोठ्या उत्पादक कंपनीने जर्मनीला अधिकृत दौºयावर गेलेल्या आपल्या वरिष्ठ व्यवस्थापकांना १४ दिवस घरीच थांबण्यास सांगितले आहे.प्रवासाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करतानाच खोकणे व शिंकणे यासाठी सभ्यताविषयक प्रशिक्षण कर्मचाºयांना देण्यात येत आहे. सीएट टायर्सच्या कारखान्यांत शिंकणाºया अथवा हलका ताप असलेल्यांची डॉक्टरांकडून तातडीने तपासणी करून घेण्यात येत आहे. सीएट टायर्सचे सीएचआरओ मिलिंद आपटे यांनी सांगितले की, उगाच घबराट निर्माण न करता सुरक्षित वातावरण तयार करणे हा यामागचा उद्देश आहे.टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी कर्मचाºयांना एक पत्र पाठवून प्रवासादरम्यान काळजी घेण्यास सांगितले आहे. ११३ अब्ज डॉलर मूल्य असलेल्या टाटा समूहाचा अर्ध्यापेक्षा जास्त महसूल विदेशातील व्यवसायातून येतो.चीनसह काही विदेशी बाजारांना कोरोनाचा फटका बसल्याने टाटा समूहाची यंदाची वृद्धी घसरण्याची शक्यता आहे. टाटा समूहातील टीसीएस आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनी कोरोनाग्रस्त देशांत येण्या-जाण्यास बंदी घातली आहे.हिंदुस्तान युनिलिव्हरने कर्मचाºयांत कोरोनाची माहिती देणारे पोस्टर्स वितरित केले आहेत. युनिलिव्हरचे सीईओ अ‍ॅलन जोपे यांनी कर्मचाºयांसाठी एक ध्वनिमुद्रित संदेश जारी केला आहे.>कर्मचाºयांना सवलतीवॉलमार्ट इंडियाने कर्मचाºयांसाठी जारी केलेल्या सूचनांत खोकला व शिंका येत असलेल्या व्यक्तीपासून किमान ६ फूट अंतर ठेवण्यास सांगितले आहे. आजारी लोकांना घरीच राहण्याच्या, तसेच मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केपीएमजीने कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्या कर्मचाºयांना स्वेच्छा पृथक राहण्याच्या, तसेच घरूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अ‍ॅव्हेरी डेनिसनच्या एचआर संचालकांनी सांगितले की, कंपनीने आरोग्यविषयक कारणांसाठी कर्मचाºयांना वेळेच्या बाबतीत सवलत दिली आहे.

टॅग्स :कोरोना