GST Effect Product Prices: एफएमसीजी कंपन्यांनी दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात, प्रॉक्टर अँड गॅम्बल, इमामी आणि एचयूएल सारख्या कंपन्यांनी नवीन किंमतीची यादी जारी केली. तसंच यासंदर्भात वितरकांना आणि ग्राहकांना त्यांच्या वेबसाइटद्वारे याबद्दल माहिती देण्यात आली आहे. नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. हे लक्षात घेऊन, कंपन्या किमती कमी करत आहेत. प्रत्येक कंपनीनं काय निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊया.
प्रॉक्टर अँड गॅम्बलची यादी
प्रॉक्टर अँड गॅम्बलनं त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीची सुधारित यादी जाहीर केली आहे. त्यांनी विक्स, हेड अँड शोल्डर्स, पॅन्टीन, पॅम्पर्स (डायपर), जिलेट, ओल्ड स्पाइस आणि ओरल-बी सारख्या ब्रँडच्या किमती कमी केल्या आहेत. यादीनुसार, विक्स अॅक्शन ५०० अॅडव्हान्स्ड आणि विक्स इनहेलरच्या किमती ६९ रुपयांवरून ६४ रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत, त्यावरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्याचप्रमाणे, कंपनीनं हेड अँड शोल्डर्स आणि पॅन्टीन सारख्या त्यांच्या शॅम्पू उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत, कारण या श्रेणीतील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
हेड अँड शोल्डर्स कूल मेन्थॉल (३०० मिली) २२ सप्टेंबरपासून ३६० वरून ३२० रुपये किमतीत मिळेल. तर हेड अँड शोल्डर्स स्मूथ अँड सिल्की (७२ मिली) ८९ वरून ७९ रुपये किमतीत उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, पॅन्टीन शॅम्पू हेअर फॉल कंट्रोल आणि पॅन्टीन शॅम्पू डीप रिपेअरची (३४० मिली) किंमत ४१० वरून ३५५ रुपये करण्यात आलीये.
पी अँड जी इंडियानं किती कमी केल्या किंमती?
पी अँड जी इंडियानं बाळांसाठी असलेल्या उत्पादनांच्या किमतीही कमी केल्या आहेत. डायपरवरील जीएसटी १२% वरून ५% पर्यंत कमी केला जाईल आणि बेबी वाइप्सवरील जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी केला जाईल. नवीन दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. कंपनी जिलेट आणि ओल्ड स्पाइसच्या किमतीही कमी करत आहे. जिलेट शेव्हिंग क्रीम रेग्युलरची (३० ग्रॅम) किंमत आता ४५ वरून ४० ₹ पर्यंत कमी केली जाईल, जिलेट शेव्हिंग ब्रशची किंमत ८५ वरून ७५ ₹ पर्यंत कमी केली जाईल आणि ओल्ड स्पाइस आफ्टर शेव्ह लोशन ओरिजिनलची (१५० मिली) किंमत ३२० वरून २८४ रुपयांपर्यंत कमी केली जाईल. ओरल-बी एव्हरीडे केअर टूथब्रशची किंमत ३५ वरून ३० ₹ पर्यंत कमी करण्यात आली आहे.
इमामीच्या प्रोडक्ट्सच्या किंमती
इमामी बोरोप्लस अँटीसेप्टिक क्रीम, नवरत्न आयुर्वेदिक तेल आणि झंडू बाम इत्यादींच्या किमतीही कमी केल्या जात आहेत. २२ सप्टेंबरपासून कंपनी बोरोप्लस आयुर्वेदिक अँटीसेप्टिक क्रीम (८० मिली) १६५ रुपयांवरून १५५ रुपये, नवरत्न आयुर्वेदिक ऑइल कूल (१८० मिली) १५५ रुपयांवरून १४५ रुपये, डर्मिकूल प्रिकली हीट पावडर मेन्थॉल रेग्युलर (१५० ग्रॅम) १५९ रुपयांवरून १४९ रुपये होणार आहे.
याचसोबत त्याचप्रमाणे, केश किंग गोल्ड आयुर्वेदिक तेलाची (१०० मिली) किंमत १९० रुपयांवरून १७८ रुपये करण्यात आली आहे. झंडू बामची (२५ मिली) किंमत १२५ रुपयांवरून ११८ रुपये करण्यात आली आहे आणि झंडू सोना चांदी च्यवनप्राशची (९०० ग्रॅम) किंमतही ३८५ रुपयांवरून ३६१ रुपये करण्यात आली आहे. इमामीनं बोरोप्लस अँटीसेप्टिक मॉइश्चरायझिंग सँडल सोपची (१२५ ग्रॅम, सहा पॅक) किंमत ३८४ रुपयांवरून ३४२ रुपये करण्यात केली आहे.
एचयूएलच्या प्रोडक्टची यादी
आणखी एक आघाडीची एफएमसीजी उत्पादक कंपनी एचयूएलनंही जीएसटीमधील बदलांनंतर २२ सप्टेंबरपासून डव्ह शॅम्पू, हॉर्लिक्स, किसान जॅम, ब्रू कॉफी, लक्स आणि लाइफबॉय साबणासह आपल्या ग्राहक उत्पादनांच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं डव्ह हेअर फॉल शॅम्पूची (३४० मिली) किंमत ४९० रुपयांवरून ४३५ रुपये आणि डव्ह सीरम बारची (७५ ग्रॅम) किंमत ४५ रुपयांवरून ४० रुपये केली आहे. यासह, क्लिनिक प्लस स्ट्रॉन्ग अँड लाँग शॅम्पूची (३५५ मिली) किंमत ३९३ रुपयांवरून ३४० रुपये आणि सनसिल्क ब्लॅक शाइन शॅम्पूची (३५० मिली) किंमत ४३० रुपयांवरून ३७० रुपये करण्यात आलीये.
साबणांपैकी, लाइफबॉयची (७५ ग्रॅमचे चार पॅक) किंमत ६८ रुपयांवरून ६० रुपये आणि लक्स रेडिएंट ग्लो साबणची (७५ ग्रॅमचे चार पॅक) किंमत ९६ रुपयांवरून ८५ रुपये करण्यात आली आहे. क्लोज-अप टूथपेस्ट (१५० ग्रॅम) किंमत १४५ रुपयांवरून १२९ रुपये करण्यात आली आहे. हेल्थ ड्रिंक श्रेणीत हॉर्लिक्स चॉकलेटची (२०० ग्रॅम) किंमत १३० रुपयांवरून ११० रुपये आणि बूस्टची (२०० ग्रॅम) किंमत १२४ रुपयांवरून ११० रुपये करण्यात आली आहे. एचयूएलनं किसान केचपचे (८५० ग्रॅम) दर १०० रुपयांवरून ९३ रुपये आणि किसान जामचे (२०० ग्रॅम) दर ९० रुपयांवरून ८० रुपये केले आहेत. ब्रू कॉफीची (७५ ग्रॅम) किंमत ३०० रुपयांवरून २७० रुपये करण्यात आली आहे.