Join us

दोनशे वस्तूंच्या दरांबाबत जीएसटी बैठकीत चर्चा; २१, २२ डिसेंबर रोजी राजस्थानात आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:56 IST

GST Council : वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात राजस्थानमध्ये वस्तू व सेवा कर परिषदेची बैठक होणार आहे.

GST Council : वस्तू व सेवा कर परिषदेची २ दिवसीय बैठक २१ व २२ डिसेंबर रोजी राजस्थानातील जैसलमेर येथे होणार असून, २०० वस्तूंवरील कराच्या दराबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पापूर्वी होणाऱ्या बैठकीस वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची उपस्थिती असेल. राज्यांचे प्रतिनिधीही यात हजेरी लावतील.

या बैठकीत विम्यावरील जीएसटी हटविण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. याशिवाय काही चैनीच्या वस्तूंवरील करात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. २० लिटरपेक्षा जास्त मोठ्या पाण्याच्या जॅरवर ५ टक्के जीएसटी लावला जाऊ शकतो. १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सायकलींवरही ५ टक्के जीएसटी लावला जाण्याची शक्यता आहे. 

१२ व १८ या टप्प्यांचे विलीनीकरण नाहीसूत्रनी सांगितले की, १२ टक्के व १८ टक्के कर टप्प्यांचे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सहमती होऊ शकली नाही. दर व्यवहार करण्यासाठी नेमलेल्या मंत्री समूहात अनेक राज्यांनी या प्रस्तावास विरोध केला.

टॅग्स :जीएसटीमुख्य जीएसटी कार्यालय