Join us  

बड्या-बड्या ई-कॉमर्स साइट्सपेक्षाही स्वस्तात सामान विकते ही सरकारी साइट; सर्व वस्तू मिळतायत ठोक किंमतीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 4:22 PM

GEM : येथे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स इतर ई-कॉमर्स साइट्सच्या तुलनेत स्वस्त दरात मिळतात. आपण येथून कुठलेही सामान खरे करू शकता.

नवी दिल्ली - भारतात ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. जर आपणही अशाच पद्धतीने शॉपिंग करत असाल तर आज आम्ही आपल्याला एका सरकारी E-commerce साइटसंदर्भात माहिती देणार आहोत. या साईटवरून आपण इतर ई-कॉमर्स साइट्सच्या तुलनेत स्वस्त दरात सामान खरेदी करू शकतात. येथे सर्व सामान ठोक दरात मिळते. यामुळे, आपण काही सामना खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी हा एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो.

इस सरकारी मार्केट प्लेसचे  नाव आहे Government e Marketplace (GEM). हे एक सरकारी मार्केट प्लेस आहे. येथे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स इतर ई-कॉमर्स साइट्सच्या तुलनेत स्वस्त दरात मिळते. आपण येथून कुठलेही सामान खरे करू शकता. यासंदर्भात अद्याप अनेक लोकांना माहिती नाही. यामुळे आपल्याला येथून सध्या सहजपणे ऑर्डर करता येईऊ शकते.

GEM वर मिळणाऱ्या वस्तूंसंदर्भात आम्ही कसल्याही प्रकारचा दावा करत नाही. मात्र, येथे अनेक वस्तू अत्यंत स्वस्त दरात विकल्या जातात, असा खुलासा एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. 2021-22 मध्ये झालेल्या इकोनॉमिक सर्व्हेमधून अशी गोष्ट समोर आली आहे, की 10 प्रोडक्ट्स असे आहेत, जे या सरकारी साइटवर इतर E-Commerce Site च्या तुलनेत अत्यंत कमी किंमतीत मिळत आहेत. 

या सर्व्हेमध्ये एकूण 22 प्रोडक्ट्सची तुलना करण्यात आली होती. यांत एकूण 10 प्रोडक्ट्स असे आढळून आले, ज्यांची किंमत जवळपास 9.5 टक्क्यांपर्यंत कमी होती. हा मोठा फरक आहे. जर ग्राहकांनी या पोर्टलवरून प्रोडक्ट खरेदी केले, तर त्यांचा फायदा  होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे फार कमी लोकांना या सरकारी E-Marketplace संदर्भात माहिती आहे.

टॅग्स :बाजारसरकारखरेदीऑनलाइन