Join us  

डिसेंबरपर्यंत वेळ द्या!; RBIच्या नियमांना गुगलची सहमती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 10:05 AM

इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने पेमेंट सेवांशी संबंधित डेटा स्थानिक स्तरावर स्टोर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. कंपनीने या नियमांचे पालन करण्यासाठी डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. 

नवी दिल्ली : इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने पेमेंट सेवांशी संबंधित डेटा स्थानिक स्तरावर स्टोअर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. कंपनीने या नियमांचे पालन करण्यासाठी डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद गेल्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कॅलिफोर्निया येथील गुगलच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि रविशंकर प्रसाद यांच्यात चर्चा झाली. यावेळी गुगलकडून भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सुरक्षतेसाठी पेमेंट सेवा देणाऱ्या सर्व कंपनांना निर्देश दिले आहेत. यामध्ये कंपन्यांनी पेमेंट सेवा संबंधित सर्व डेटा देशात स्टोअर केला पाहिजे. यासाठी कंपन्यांना ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

(गुगलकडूनही मिळणार कर्ज; पाहा कसे ते...)

दरम्यान, जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने भारतात पेमेंट सेवांशी संबंधित सुविधा सुरु केल्या आहेत. गुगल तेज या पैशांच्या देवाण-घेवाण संबंधित अॅपचे नाव बदलून गुगल पे करण्यात आले आहे. याच अॅपद्वारे  गुगल पुढील काही महिन्यांपासून कर्ज वाटणार आहे. यासाठी गुगलने काही बँकांशी सहकार्य करार केला आहे.  

टॅग्स :गुगलभारतीय रिझर्व्ह बँक