Join us

कस्टम्समध्ये माल अडकला; जपानी कंपन्या संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 01:37 IST

customs : कस्टम्स कायद्यातील बदल सप्टेंबरपासून अंमलात आले. परंतु, त्याचा फटका बसताना दिसत आहे. विलंब हाेणे, माेठ्या प्रमाणात माल अडकून राहाणे,इत्यादी समस्या निर्माण झाल्या आहेत.

नवी दिल्ली : आयात केलेल्या उत्पादनांवर मूळ देशाचे नाव आणि सुट्या भागांचे मूल्य जाहीर करणे बंधनकारक केल्यानंतर जपान आणि दक्षिण काेरियासह ‘आसियान’ देशांनी ओरडायला सुरूवात केली आहे. बदललेल्या नियमांमुळे या देशांतील उत्पादकांचे माेठे नुकसान हाेत असल्यामुळे नाराजी व्यक्त हाेत आहे.कस्टम्स कायद्यातील बदल सप्टेंबरपासून अंमलात आले. परंतु, त्याचा फटका बसताना दिसत आहे. विलंब हाेणे, माेठ्या प्रमाणात माल अडकून राहाणे,इत्यादी समस्या निर्माण झाल्या आहेत. या देशांमधील कंपन्यांना आयातशुल्कामध्ये सवलत मिळते. परंतु, पुरवठा लवकर करण्यासाठी या कंपन्यांना सर्वसामान्य शुल्क भरावे लागत आहे.  हा मुद्दा जपान चेंबर ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्री इन इंडिया आणि भारत-जपान परराष्ट्र व्यापार संस्थेच्या वेबिनारमध्ये चर्चेला आला हाेता. जपानच्या सुमारे ६००  कंपन्यांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :व्यवसाय