Join us  

खुशखबर! मुंबईसह ठाणे जिल्ह्यात दिवाळीपेक्षा सोने १ हजार रूपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 6:04 PM

सराफा व्यापा-यांमध्ये चैतन्य; ग्राहकांनी सोने खरेदी करण्याचे आवाहन

अनिकेत घमंडी

डोंबिवली - सोने महागाईमुळे दिवाळ सणावर पाणी फिरले असतानाच आठवडाभरातच सोने तोळयामागे ८०० ते १००० रूपयांनी उतरल्याने पुन्हा एकदा सराफ व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर घसरल्याने आणि काही अंशी रूपया वधारल्याने सोन्यामध्ये घसरण झाल्याची माहिती आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टीक कौन्सिलचे संचालक नितिन कदम यांनी दिली.कदम म्हणाले की भारताला त्याचा सर्वाधिक लाभ झाला असून ज्या ग्राहकांना दिवाळीमध्ये सोने खरेदी करता आलेली नाही त्यांनी आता ही संधी सोडू नये. हा लाभ आणखी किती दिवस मिळू शकतो हे आताच सांगता येणार नसले तरी आठवडाभरापासून सोने उतरले आहे, निश्चितच आणखी काही दिवस तरी चढ्या भावाने सोने विक्रीस लागणार असून ग्राहकांना आणखी एक सुवर्णसंधीच असल्याचे ते म्हणाले. चांदीमध्येही किलोमागे १ हजार रूपयांची घसरण झाली असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीत अपेक्षेप्रमाणे सोने विक्री झाली नाही, त्यामुळे आगामी काळातील लग्नसराई लक्षात घेता ग्राहकांना सोने उतरल्याची माहिती देण्यासाठी विविध योजना लागू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. मुंबईत झवेरी बाजार आणि ठाणे जिल्ह्यातही सोने उतरल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये चैतन्य आहे, ग्राहक याचा लाभ कसा उठवतात हे बघणे आता औत्स्यूक्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांनी या संधीचा लाभ उठवावा असे आवाहन कदम यांनी केले.

टॅग्स :सोनंठाणेव्यवसाय