Join us  

गुड न्यूज ! गुजरात अन् तामिळनाडूतील फोर्डचे बंद युनिट खरेदी करणार 'टाटा' 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 12:44 PM

टाटा मोटर्सकडून तामिळनाडू आणि गुजरातमधील फोर्डचं युनिट विकत घेण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. जर हा व्यवहार झाला तर, टाटा हे अमेरिकेतील दुसरी कंपनी खरेदी करत आहेत.

ठळक मुद्देफोर्डच्या दोन युनिटची क्षमता वर्षाला 4.4 लाख कार बनविण्याची आहे. त्यामध्ये, 4000 कर्मचारी काम करतात. देशात 170 डिलरचं नेटवर्क फोर्ड कंपनीचं आहे.

मुंबई - जगातील सर्वात मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या फोर्डने भारतातून एक्झिट (Ford exit) करण्याचा निर्णय घेतला. वाहनांची कमी विक्री, कोरोना काळ यामुळे कंपनी मेटाकुटीला आली होती. फोर्डचे भारतात दोन प्लांट होते. त्यापैकी एक प्लांट देण्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून होती. परंतू दोन्ही प्लँट बंद करण्याची तयारी कंपनीने त्या आधीपासूनच केली होती. आता, टाटा मोर्टर्सकडून हे दोन्ही प्लँट खरेदी करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. तसेच, यासंदर्भात टाटांची बोलणीही सुरू आहे. 

टाटा मोटर्सकडून तामिळनाडू आणि गुजरातमधील फोर्डचं युनिट विकत घेण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. जर हा व्यवहार झाला तर, टाटा हे अमेरिकेतील दुसरी कंपनी खरेदी करत आहेत. यापूर्वी 2008 मध्ये टाटांनी जग्वार लँड रोव्हर ही कंपनी खरेदी केली होती. त्यावेळी, त्याचे मूल्य 2.3 बिलियन्स डॉलर एवढे होते.

फोर्डच्या दोन युनिटची क्षमता वर्षाला 4.4 लाख कार बनविण्याची आहे. त्यामध्ये, 4000 कर्मचारी काम करतात. देशात 170 डिलरचं नेटवर्क फोर्ड कंपनीचं आहे. त्यामुळे, टाटा मोर्टर्सने फोर्ड कंपनीचे हे युनिट विकत घेतल्यास येथील कर्मचाऱ्यांचा आणि ग्राहकांचा मोठा फायदा होईल. तर, टाटा मोटर्सकडून पर्यावरणपूरक गाड्या बनविण्यावर भर देण्यात येत आहे. या पर्यावरणपूरक गाड्यांच्या उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी फोर्डच्या या दोन युनिट्सचा टाटा कंपनीला फायदा होईल. 

डिलरशीप बंद, सर्व्हीस सुरू

फोर्डची कार विक्रीसाठीच नसल्याने डीलरशीप बंद होणार आहेत. तर त्यांची सर्व्हिस सेंटर सुरु राहणार आहेत. मस्तंग, एंडोव्हर इम्पोर्ट होणार असल्याने या कारचा जिथे सेल होता, तेथील आणि महत्वाच्या शहरांतील डीलरशीप सुरु राहतील. परंतू छोट्या कार आता यापुढे मिळणार नाहीत. तसेच जी सर्विहस सेंटर तोट्यात होती, ती देखील बंद होण्याची शक्यता आहे किंवा ती स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, फोर्डची कार वापणाऱ्यांना थोडासा दिलासा कंपनीने दिला आहे. 

कर्मचाऱ्यांना दुसरीकडे ऑफर पण कमी पगारात

फोर्डच्या कर्मचाऱ्यांना अन्य कंपन्यांच्या सर्विहस सेंटर किंवा शोरुममध्ये नोकरी देण्याची ऑफर मिळत आहे. परंतू ही ऑफर फोर्डमध्ये होता त्यापेक्षा निम्म्या पगाराची आहे. एकीकडे नोकरी गेली तर काय असा प्रश्न असताना दुसरीकडे कमी पगारात काम कसे परवडेल असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे. कंपनीने अद्याप कर्मचारी, डीलर यांना विश्वासात घेतलेले नाही. या निर्णयाची सारे वाट पाहत आहेत.  

टॅग्स :फोर्डटाटागुजराततामिळनाडू