Join us  

PNB च्या ग्राहकांसाठी खूशखबर! बँकेने कमी केले 'हे' चार्ज, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 3:59 PM

Punjab National Bank : बँकेने कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि Doorstep सर्व्हिस आवश्यक असल्याचे विचारात घेऊन सर्व्हिस चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआता पीएनबी ग्राहकांना Doorstep Bankingद्वारे रोख रक्कम मिळविण्यासाठी केवळ 50 रुपये द्यावे लागणार आहेत.

नवी दिल्ली : जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि Doorstep सर्व्हिस आवश्यक असल्याचे विचारात घेऊन सर्व्हिस चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनबीने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी Doorstep Banking चे चार्ज कमी केले आहे. बँकेने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. (good news for pnb customers cash withdrawal service through doorstep banking has been reduced)

आता पीएनबी ग्राहकांना Doorstep Bankingद्वारे रोख रक्कम मिळविण्यासाठी केवळ 50 रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी या सर्व्हिससाठी 60 ते 100 रुपये द्यावे लागत होते. दरम्यान, जर तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल आणि तुम्हाला रोख रक्कम हवी असेल तर तुम्ही घरी बसून रोख रक्कम देखील मिळवू शकता. जवळजवळ सर्व बँका ही सुविधा देत आहेत. मात्र, यासाठी चार्ज आकारले जाते.

(Paytm मध्ये नवे फीचर, Wallet बॅलन्सने सुद्धा करू शकता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट)

तुम्हाला जर पीएनबीच्या Doorstep Banking सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी रजिस्टर्ड करावे लागेल. हे लक्षात असू द्या की मोबाइल नंबर हा आपल्या बँक खात्यासोबत रजिस्टर्ड केलेला पाहिजे. जाणून घ्या काय आहे, ही प्रक्रिया...

>>  स्वत: रजिस्टर करण्यासाठी तुम्ही Toll-Free नंबर 1800-10-37-188 किंवा 1800-12-13-721 वर कॉल करू शकता.>>  www.psbdsb.in या वेबसाइटला भेट देऊन सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता.>> मोबाइलमध्ये DSB मोबाइल अॅप डाऊनलोड करूनही तुम्ही स्वत: रजिस्टर करू शकता. >> मोबाईल अॅपवर लॉग-इन करा आणि तुमचे बँक डिटेल्स सिलेक्ट करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर व्हॅलिडेशनसाठी एक OTP येईल. हा अपलोड करा. ज्यावेळी व्हेलिडेशन पूर्ण होईल, त्यावेळी अॅपवर बँकेचे नाव, खाते नंबर, खातेधारकाचे नाव, खात्याचा प्रकार आणि बँक शाखेचे नाव येईल.  

जास्तीत जास्त दहा हजार रुपये मागवू शकताकोणत्याही सार्वजनिक बँकेचे ग्राहक डीएसबी अ‍ॅप / वेब पोर्टलचा वापर करून किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करून रोख पैसे काढण्याची सेवा बुक करू शकतात. रिअल टाइम रोख पैसे काढणे उपलब्ध असेल. यासाठी ग्राहकाचे बँक खाते आधार किंवा डेबिट कार्डाशी जोडले जाणे आवश्यक आहे. प्रति व्यवहाराची मर्यादा किमान रुपये १००० आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकबँकपैसा