आज पासून (१ जून) देशभरात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. यामुळे आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती सुमारे २४ रुपयांनी कमी झाल्या आहेत. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबे आदींना याचा फायदा होईल. कारण येथे हे सिलिंडर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
या व्यवसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने, व्यवसायासाठीचा खर्च कमी होईल. परिणामी ग्राहकांना चांगली सेवा मिळू शकेल. महत्वाचे म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एप्रिल आणि मे महिन्यात किती कमी झाला होता भाव -खरे तर, या व्यावसायिक सिलिंडरचे दर सलग तिसऱ्या महिन्यात कमी झाले आहेत. यापूर्वी मे महिन्यात १४.५ रुपयांनी तर एप्रिल महिन्यातही ४१ रुपयां या सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते.
काही मोठ्या शहरातील व्यवसायिक LPG चे दर असे... - दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 19 किलोच्या व्यवसायिक LPG सिलिंडरची किंमत 1723.50 रुपये असेल. कोलकाता - येथे व्यवसायिक सिलिंडरची नवी किंमत 1826 रुपये असेल. चेन्नई - तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1881 रुपयांना मिळेल.मुंबई- मुंबई मध्ये हा सिलिंडर 1674.50 रुपयांना मिळेल. बंगळुरू - येथे या सिलिंडरची किंमत 1796.50 रुपये झाली आहे, जी आधी 1,820.50 रुपये होती. नोएडा - नोएडामध्ये आजपासून व्यवसायिक सिलिंडर 1723.50 रुपयांना मिळेल. चंदीगड - आजपासून चंडीगडमध्ये हा सिलिंडर 1743 रुपयांना मिळेल.