नवी दिल्ली : जर तुम्ही खासगी क्षेत्रात काम करत असाल आणि निवृत्तीसाठी राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम (एनपीएस) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. १ ऑक्टोबरपासून, या पेन्शन फंडांचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या (फंड हाऊसेस) एनपीएस सदस्यांसाठी एक योजना सुरू करणार आहेत, ज्यामध्ये १०० टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सरकारी कर्मचारी वगळता सर्व गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतील. पेन्शन नियामक पीएफआरडीएने ही नवीन योजना जाहीर केली आहे. तिला 'मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क' असे म्हणतात. (एमएसएफ)
एनपीएस शुल्कातही बदल
एनपीएस-एनपीएस वात्सल्य
प्राण खाते उघडणे
१८
शुल्क
फिजिकल प्राण कार्ड
४०
वार्षिक देखभाल शुल्क
१००
व्यवहार शुल्क
अटल पेन्शन-एनपीएस लाइट
प्राण खाते उघडणे
१५
१५
वार्षिक देखभाल शुल्क
व्यवहार शुल्क
(सर्व रक्कम रुपयांत)
शिल्लकनुसार वार्षिक देखभाल शुल्क
बॅलन्स
शुल्क
१ लाख रुपयांपर्यंत
१ ते २ लाख रुपये
१००
२ लाख ते १० लाख
१५०
१० लाख ते २५ लाख
३००
२५ ते ५० लाख रुपये
४००
५० लाख रुपयांपेक्षा जास्त
५००
(एनपीएस-एनपीएस वात्सल्यसाठी वार्षिक देखभाल शुल्क रुपयांमध्ये)
या पेन्शन योजनेचे दोन प्रकार असतील : मल्टीपल स्कीम फ्रेमवर्कमध्ये मध्यम आणि उच्च जोखीम असे दोन प्रकार असतील. उच्च जोखीम योजनांमध्ये १०० टक्के इक्विटी गुंतवणुकीची परवानगी असेल.
ही योजना ग्राहकांना निवृत्ती वेतनासाठी सोयीनुसार पर्याय देईल. सदस्यांना कायमस्वरूपी खाते क्रमांक (प्राण) द्वारे ओळखले जाईल.
गुंतवणुकीचा खर्चही कमी
पेन्शन फंडांना कॉर्पोरेट कर्मचारी, गिग कामगार आणि व्यावसायिक अशा वेगवेगळ्या गटांसाठी विशिष्ट योजना सुरू करण्याची परवानगी असेल. गुंतवणूकदारांना एकूण गुंतवणुकीबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल.
यामुळे त्यांचे पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होईल. गुंतवणूक खर्चदेखील कमी असेल. वार्षिक शुल्क ०.३० टक्केपर्यंत आणि पेन्शन फंडांना नवीन सदस्यासाठी ०.१०% प्रोत्साहन मिळेल.
व्हेस्टिंग कालावधी १५ वर्षे
या योजनेत किमान व्हेस्टिंग कालावधी १५ वर्षे आहे. जर तुम्हाला एका योजनेतून दुसऱ्या योजनेत स्विच करायचे असेल, तर तुम्ही १५ वर्षे पूर्ण केल्यानंतर किंवा सामान्य एक्झिटच्या वेळीच करू शकता. निवृत्तीनंतर, ग्राहकांना ६० टक्के कॉपर्स मिळेल आणि ४०% अॅन्युटी खरेदी करण्यासाठी वापरला जाईल.