Join us  

खूशखबर! कोरोनाकाळात ही बँक आपल्या ग्राहकांना देतेय मोफत रेशन, असा घेता येईल लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 9:52 AM

Free rations to its customers: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. यादरम्यान, एका बँकेने मानवतेच्या दृष्टीने आपल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. यादरम्यान, एका बँकेने मानवतेच्या दृष्टीने आपल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC FIRST Bank) आपल्या ग्राहकांना मोफर रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बँकेने घर घर रेशन या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत बँक कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि अल्प उत्पन्न असलेल्या ग्राहकांना मदत करणार आहे. (IDFC FIRST bank offers free rations to its customers)

घर घर रेशन योजनेंतर्गत बँकेत उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोविड कस्टमर केअर फंडच्या माध्यमातून आपले योगदान दिले आहे. बँकेने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या ५० हजार अल्प उत्पन्न असलेल्या ग्राहकांची या योजनेसाठी निवड केी आहेय या ग्राहकांना रेशन किट देण्यात येत आहे. या किटमध्ये १० किलो तांदूळ, पीठ, दोन किलो डाळ, १ किलो साखर आणि मीठ, १ किलो खाद्यतेल मिश्र मसाल्यांचे एक पाकिट, चहा आणि बिस्किटाचा समावेश आहे.  बँकेकडून वाटप करण्यात येत असलेल्या या रेशन किटचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँकेचे ग्राहक असल्याच बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क करू शकता. ग्रामीण भागात कर्मचारी रेशन किट घरोघरी जाऊन वितरित करत आहेत. तर शहरी भागांमध्ये कर्मचारी रूपेचे प्रिपेड कार्ड देत आहेत. बँकेकडून महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आतापर्यंत १ हजार रेशन किट यशस्वीरीत्या प्रदान करण्यात आले आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबँकिंग क्षेत्रभारतबँक