Join us
Daily Top 2Weekly Top 5

३६ कोटी Airtel युजर्ससाठी खूशखबर; ४००० रुपयांचं 'हे' सबस्क्रिप्शन मिळणार फ्री, जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:01 IST

Airtel Adobe Premium Subscription: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलनं (Airtel) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर दिली आहे. पाहा एअरटेल कोणती देणार प्रीमिअम सुविधा, जाणून घ्या.

Airtel Adobe Premium Subscription: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलनं (Airtel) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर दिली आहे. 'अडोबी' (Adobe) सोबत झालेल्या भागीदारीनंतर, कंपनी आपल्या सुमारे ३६ कोटी युजर्सना Adobe Express Premium चं एक वर्षाचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत देणार आहे. विशेष म्हणजे, या ऑफरचा लाभ मोबाईल आणि ब्रॉडबँड ग्राहकांव्यतिरिक्त कंपनीच्या डीटीएच युजर्सनाही घेता येणार आहे.

काय आहे Adobe Express Premium?

अडोबी एक्सप्रेस हे एक लोकप्रिय 'ऑल-इन-वन' कंटेंट क्रिएशन टूल आहे. याद्वारे युजर्स पोस्टर्स, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, रील्स, प्रेझेंटेशन आणि बॅनर्स तयार करू शकतात. याचं प्रीमियम व्हर्जन सशुल्क असले तरी, एअरटेल युजर्सना पुढील १२ महिने यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. प्रीमियम व्हर्जनमध्ये अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्सचा समावेश असतो.

अॅडव्हान्स्ड एआय (AI) फीचर्सचा लाभ

प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये वापरकर्त्यांना अनेक आधुनिक आणि एआय-पावर्ड फीचर्स मिळतील, जसं की:

  • एआय इमेज जनरेशन आणि बॅकग्राउंड रिमूव्हल.
  • टेक्स्ट-टू-इमेज टूल आणि व्हिडिओ एडिटिंग.
  • ऑटो कॅप्शन, प्रीमियम टेम्पलेट्स आणि हजारो प्रोफेशनल फॉन्ट्स.
  • अडोबी स्टॉकचे प्रीमियम असेट्स आणि १०० जीबी क्लाउड स्टोरेज.
  • कोणत्याही वॉटरमार्कशिवाय कंटेंट एक्सपोर्ट करण्याची सुविधा.

फ्री सबस्क्रिप्शन कसं मिळवाल?

जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल, तर खालीलप्रमाणे हे सबस्क्रिप्शन मिळवू शकता: १. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Airtel Thanks App उघडा. २. ॲपमधील 'रिवॉर्ड्स' किंवा 'OTT' सेक्शनमध्ये जा. ३. तिथे तुम्हाला Adobe Express Premium ची ऑफर दिसेल, त्यावर टॅप करा. ४. अडोबी अकाउंटनं लॉगिन किंवा साईन-अप करताच तुमचं सबस्क्रिप्शन अॅक्टिव्हेट होईल.

कोणाला होणार सर्वाधिक फायदा?

एअरटेलची ही ऑफर कंटेंट क्रिएटर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स, विद्यार्थी, व्यवसाय मालक आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोणतंही महागडं सॉफ्टवेअर न खरेदी करता त्यांना प्रोफेशनल दर्जाचा कंटेंट तयार करता येईल. या उपक्रमाद्वारे आपल्या ग्राहकांना डिजिटल टूल्स उपलब्ध करून देण्यासोबतच नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचा एअरटेलचा प्रयत्न आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Airtel Offers Free Adobe Subscription to 360 Million Users

Web Summary : Airtel partners with Adobe to offer a free one-year Adobe Express Premium subscription to its 360 million users, including mobile, broadband, and DTH customers. This provides access to AI-powered features for content creation, benefiting creators and businesses.
टॅग्स :एअरटेल