Join us  

खूशखबर! किसान क्रेडिट कार्डावर लवकरच मिळणार एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 9:24 AM

आता किसान क्रेडिट कार्डाद्वारेही मोदी सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहे.

ठळक मुद्देआता किसान क्रेडिट कार्डाद्वारेही मोदी सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहे. केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डाद्वार कर्ज घेणं आणखी सोपं केलं आहे. त्या आश्वासनाची पूर्तता मोदी सरकारनं केल्यास त्याचा 14.5 कोटी शेतकरी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे.

नवी दिल्लीः मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी नवं नव्या योजना घेऊन येत असतं. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडून सातत्यानं प्रयत्न सुरू असतात. आता किसान क्रेडिट कार्डाद्वारेही मोदी सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहे. केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डाद्वार कर्ज घेणं आणखी सोपं केलं आहे. भाजपानं आपल्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डावर लाखभर रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता मोदी सरकारनं केल्यास त्याचा 14.5 कोटी शेतकरी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे. परंतु बिनव्याजी दिलेलं हे कर्ज फेडण्यासाठी काही अटी आणि शर्थीही ठेवण्यात येणार आहेत. 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्राचा मानसकेंद्र सरकारनं 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या लक्ष्याला म्हणावं तसं यश अद्याप मिळालेलं नाही. शेतकऱ्यांनी सावकारांऐवजी बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज घ्यावं, यासाठी सरकारनं किसान क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी वसूल करण्यात येणार शुल्क संपवलं आहे. गावांमध्ये कॅम्प लावण्याचे निर्देशकेंद्र सरकारनं जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीला गावांमध्ये कॅम्प लावण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते, बँकांकडे अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत किसान क्रेडिट कार्ड तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 

शेतकऱ्यांना मिळते मोठी सूटव्याजमुक्त किसान क्रेडिट कार्डवर निर्णय होणं अद्याप बाकी आहे. सध्या तरी शेती आणि शेतकऱ्यांना सर्वात स्वस्त व्याज केसीसीवर मिळतं. फक्त त्यावर 4 टक्के व्याज आकारलं जातं. कोणताही सावकार एवढ्या कमी व्याजदरावर कर्ज देत नाही. ओळख पत्र, वास्तव्याचं प्रमाण पत्र, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा आणि फोटो, असे कागदपत्र दिल्यानंतर बँकांना केसीसी तयार करून द्यावं लागणार आहे. देशात सध्या 7 कोटी शेतकऱ्यांजवळ किसान क्रेडिट कार्ड आहे.  

टॅग्स :शेतकरी