Join us  

अनिल अंबानींना 'अच्छे दिन', इन्फ्रा कंपनीनं फेडलं कर्ज; शेअरमध्ये तुफान तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 4:25 PM

कंपनीचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 3000% पेक्षा जास्त वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी शेअर्स 9.20 रुपयांवर होते.

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर मंगळवारी 8 टक्क्यांहून अधिक वाढून 293.95 रुपयांवर पोहोचला. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कर्ज परतफेडीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आल्यानंतर रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. रिलायन्स इन्फ्रानं आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. सेटलमेंट कराराच्या अटींनुसार कंपनीने JC फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला त्यांचं आंशिक पेमेंट करण्यात आलं आहे. तसंच, सेटलमेंट अॅग्रीमेंटमध्ये बदल करण्यात आला आहे. 

रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 3000% पेक्षा जास्त वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 9.20 रुपयांवर होते. 2 एप्रिल 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 293.95 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या एका वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स 100% पेक्षा अधिक वाढले आहेत. 3 एप्रिल 2023 रोजी कंपनीचे शेअर 146.35 रुपयांवर होते. 2 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 293.95 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 131.40 रुपये आहे. 

रिलायन्स पॉवरमध्येही तेजी 

मंगळवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्येही वाढ झाली. कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि ते 30.33 रुपयांवर पोहोचले. गेल्या 4 वर्षात रिलायन्स पॉवरचे शेअर्स 2585% वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 1.13 रुपयांवर होते. 2 एप्रिल 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 30.33 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या एका वर्षात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 191% ची जबरदस्त वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 57% पेक्षा जास्त वाढ झाली. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 33.10 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 9.95 रुपये आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स