जळगाव : अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात वाढ करण्यासह अमेरिका, इराण व इराकमधील तणाव आणि शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम या सर्वांमुळे सुवर्ण बाजारात मोठी चढ-उतार होत आहे. सोमवारी रोजी सोने ३४ हजार ९०० रुपयांवर पोहचल्यानंतर मंगळवारच्या एकाच दिवसात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ३४ हजार ४०० रुपयांवर आले. चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत.
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी, अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. सध्या अमेरिका, इराण, इराक यांच्यातील तणावाचा परिणामही सोन्यावर होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम वाढ होत आहे. त्यामुळे २० जून रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले.त्यानंतर सोन्यात चढ-उतार सुरूच राहून ४ जुलै रोजी ते ३४ हजार ४०० रुपयांवर पोहचले. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर झाला. त्यात सोन्यावरील सीमा शुल्कात अडीच टक्क्याने वाढ करण्यात आल्याने सोन्याचे भाव ३५० रुपये प्रती तोळ््याने वाढले व ते ३४ हजार ७५० रुपयांवर पोहचले. ही भाव वाढ अशीच सुरू राहून सोन्याने ३५ हजाराकडे झेप घेत ८ जुलै रोजी ते ३४ हजार ९०० रुपयांवर पोहचले.सोने ३४ हजार ९०० रुपयांवर पोहचले असताना ते ३५ हजारावर जाणार असे वाटत असतानाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि आंरराष्ट्रीय पातळीवर दलालांनीही सोने खरेदीत हात आखडचा घेतला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कमी झाले. भारतातही सोने एकाच दिवसात ५०० रुपये प्रती तोळ््याने घसरुन आज ते ३४ हजार ४०० रुपयांवर आले.