Join us  

Gold Silver Price: सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले; चांदीचे दर मात्र वाढले, झटपट बघून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 12:23 PM

Gold Rate today: गेल्या सत्रात चांदीची किंमत 0.8 टक्के घसरली होती. गेल्या आठवड्यात सोने पाच महिन्यांच्या उच्च स्तरावर म्हणजेच 49,700 रुपये प्रति 10 ग्राम झाला होता.

आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या (Gold ) वायदा किंमतीमध्ये घट झाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचा वायदा भाव हा 49,159 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. तर चांदीच्या (Silver) वायदा किंमतीत 0.2 टक्क्यांनी वाढून 71,370 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. (Gold price today on MCX)

गेल्या सत्रात चांदीची किंमत 0.8 टक्के घसरली होती. गेल्या आठवड्यात सोने पाच महिन्यांच्या उच्च स्तरावर म्हणजेच 49,700 रुपये प्रति 10 ग्राम झाला होता. यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मार्चमध्ये सोन्याच्या किंमती 44,000 रुपये प्रति 10 ग्राम झाली होती. 

जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून 1,893.78 डॉलर प्रति औंस होती. चांदीचा दर 27.63 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनमचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,160.81 डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी 2020-21 मध्ये भारतात सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर म्हणजेच 2.54 लाख कोटी रुपये झाली होती. 

मागच्या व्यापार सत्रात सोन्याच्या दरात 388 रुपये आणि चांदीच्या दरात 920 रुपयांची घसरण दिसून आली. एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सराफा बाजारातही शुक्रवारी सोन्याचा दर 388 रुपयांनी घसरून 47,917 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला हाता. याच प्रकारे चांदीचा दरही 920 रुपयांनी कमी होऊन 69,369 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला होता. यापूर्वीच्या व्यापार सत्रात हा दर 70,289 रुपये प्रति किलो ग्रॅम एवढा होता.

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंजचांदी